लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.


नवी मुंबई - यशवंतराव चव्हाण फाऊडेंशन मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातुन राजकिय,सामाजिक,सहकार,सांस्कृतिक,कला-क्रिडा,उद्योग,शिक्षण या विविध.क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे काम हि संस्था करत आहे.व्यक्ति आणी संस्था यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम हि संस्था करत आहे.संस्थेचे पुरस्कार देण्याचे हे पहिले वर्ष आहे.महाराष्ट्रातील विविध भागातुन पुरस्करासाठी अर्ज मागविण्यात आले होते.या मध्ये नेरूळ मधील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांचे कार्य प्रभावीपणे संस्थेच्या निदर्शनास आले म्हणुन त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात येत आहे अशी माहीती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय किसन सांवत यांनी दिली. लवकरच हा सोहळा मुंबई या ठिकाणी आयोजित करून सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहे अशीही माहीती त्यांनी दिली.
                 जिवन जगत असताना आपण या समाजाला काही तरी देणं लागतो. आणी हिच भावना मना मध्ये ठेवुन सांगत अनेक वर्ष नेरूळ मध्ये काम करत आहे.तसे पाहीले तर कोणतेही राजकिय पाठबळ नसताना समाजाची सेवा करण खुप अवघड असते.परंतु यातुनही आम्ही मार्ग काढला.आणी जे काही या समाजात वंचित घटक आहे. त्यांना मदत करत गेलो.या कामी मला सर्वांची मदत झाली. आणि सर्वांच्या सहकार्याने हे काम शक्य झाले.आज जो मला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळणार आहे. त्या पुरस्काराचे खरे मानकरी माझ्या बरोबर काम करणा-या माझ्या सर्व सहकारी या आहेत.या कोरोना महामाराच्या काळामध्ये आम्ही लोकांना मोफत मास्क पुरवले, सॅनिटायझर पुरवले,तसेच अनेक ठिकाणी रोशन देखील पुरविले.या कामी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य चे खुप असे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.हा पुरस्कार मला देवुन माझ्या संस्थेचा,माझे कार्याचा गौरव केल्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सांवत याचे आभार मानते.


Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image