ट्रक, ट्रेलर व डंपर चोरणाऱया सराईत चौकडीला अटक,तिघांना कोरोनाची लागण 

ट्रक, ट्रेलर व डंपर चोरणाऱया सराईत चौकडीला अटक,तिघांना कोरोनाची लागण 
नवी मुंबई : ट्रक, ट्रेलर व डंपर चोरणाऱया सराईत चौकडीला पकडून त्यांनी चोरुन नेलेला दहा चाकी हायवा ट्रक हस्तगत करण्यात एनआरआय पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेले चोरटे कोरोनामुळे गत महिन्यामध्ये तात्पुर्ता जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पुन्हा वाहन चोरी करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळुन आले आहे.याच चौकडीवर चोरीचे 5 ते 6 गुन्हे दाखल असून ते याच गुह्यात कारागृहात बंदिस्त होते.मात्र कोरोनामुळे न्यायालयाने गत महिन्यामध्ये या चौघांना तात्पुर्ता जामिन देऊन त्यांची कारागृहातुन सुटका केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर या चोरटयानी पुन्हा पंधरा दिवसांमध्ये 3 अवजड वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी शुक्रवारी एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
                          प्रताप लोमटे (४१), संजय अपुने (४१), रोशन कांबळे (२४) आणि दत्ता कांबळे (२५) अशी या चोरटयाची नावे असून या चोरटयानी न्हावा-शेवा व पनवेल भागातून देखील दोन ट्रेलर चोरुन नेल्याचे व त्यांची भंगारात विल्हेवाट लावल्याचे उघडकिस आले आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी प्रताप लोमटे, संजय अपुने व दत्ता कांबळे हे तिघेही ड्रायव्हर असुन त्यांना चावी शिवाय वाहन चालु कशी करायची याची चांगली माहिती आहे. त्यामुळे हे तिघेही रोशन कांबळे याच्या रिक्षातून पहाटेच्या सुमारास वाहन चोरी करण्यासाठी बाहेर पडायचे त्यानंतर ते रस्त्याच्या बाजुला उभे असलेले ट्रक,ट्रेलर व डंपर चावी शिवाय सुरु करुन ते वाहन प्रताप लोमटे व दत्ता कांबळे हे पुण्यात विक्रिसाठी घेऊन जायचे. अशाच पद्धतीने या चौकडीने गत आठवडयात उलवे परिसरातुन दहा चाकी हायवा ट्रक चोरुन नेला होता. याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी या वाहन चोरी प्रकरणाचा तपास सुरु केला होता.या गुह्याच्या तपासादरम्यान, उलवे येथून चोरुन नेलेला हायवा ट्रक पुण्यात विक्री करण्यासाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुण्यात जाऊन ट्रक विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रताप लोमटे व संजय अपुने या दोघांना अटक केली. तसेच त्यांनी चोरलेला ट्रक ताब्यात घेतला. त्यांनतर पोलिसांनी या दोघांकडून अधिक माहिती घेऊन या गुह्यात सहभागी असलेले त्यांचे साथिदार रोशन कांबळे व दत्ता कांबळे या दोघांना जुईनगर येथून अटक केली. या चौघांनी पंधरा दिवसापुर्वी न्हावा-शेवा व पनवेल भागातून दोन ट्रेलर चोरल्याचे तसेच दोन्ही ट्रेलरची न्हावा-शेवा येथील भंगारात विल्हेवाट लावल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यानुसार पोलिसांनी न्हावा-शेवा भागातील अक्रम शहा या भंगारवाल्याला देखील अटक केली आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेले सराईत चोरटे प्रताप,संजय, दत्ता आणि रोशन यांच्यावर यापुर्वी देखील वाहन चोरीचे 5 ते 6 गुन्हे दाखल असून ते याच गुह्यात कारागृहात  बंदिस्त होते. मात्र कोरोनामुळे न्यायालयाने गत महिन्यामध्ये या चौघांना तात्पुर्ता जामिन देऊन त्यांची कारागृहातुन सुटका केली होती. या आरोपींपैकी तिघांना कोरोनाची लागण झाली असून एका आरोपीला वाशी येथील रुग्णालयात तर इतर दोघांना इंडिया बुल्स येथे कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्यांच्या चौथ्या साथिदाराची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  


Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image