सोसायटी, वसाहतीपर्यंत मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन सेवा देणा-या व जनजागृती करणा-या "मिशन झिरो नवी मुंबई" उपक्रमास  प्रारंभ


नवी मुंबई - कोरोनाबाधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कोरोनाची साखळी खंडित करण्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर दिला जात असून याकरीता भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांच्या घरापर्यंत मोबाईल व्हॅनव्दारे अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा एक चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त करीत यामधून मृत्युदर कमी करण्याचे उद्दीष्ट साध्य होईल अशी खात्री वाटते असे सांगितले.


          भारतीय जैन संघटनेच्या वतीने 'मिशन झिरो नवी मुंबई' या उपक्रमाची सुरुवात ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खासदार राजन विचारे यांच्या सन्माननीय उपस्थितीत, वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या आवारात करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर, शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री धर्मेशभाई जैन, विजय लखानी, राहुल नाहटा, राजुल व्होरा, शिल्पिन तातर, डॉ. विवेकानंद सावंत व इतर महापालिका अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेण्यात आले असून त्याव्दारे लवकरात लवकर रुग्ण शोध आणि त्याचे विलगीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेने अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या अँटीजेन टेस्टींगवर भर दिला असून 22 अँटीजेन टेस्टींग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे रुग्ण शोध मोहिमेला गती प्राप्त झाली आहे.तरीही अनेक नागरिक अँटीजेन टेस्टींग केंद्रांपर्यंत येऊन टेस्ट करत नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी 'अँटीजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत' ही संकल्पना नजरेसमोर ठेवून सोसायटी, वसाहतींपर्यंत अँटीजेन टेस्ट करण्यासाठी 'मोबाईल अँटिजेन टेस्ट व्हॅन' सुरु करण्याचे ठरविले. आयुक्तांच्या या संकल्पनेला भारतीय जैन संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या माध्यमातून कोव्हीड-19 प्रतिबंधाचा प्रचार व अँटीजेन टेस्टींग सेवा देण्यासाठी नियोजन करण्यात आले. या उपक्रमास युनायटेड वे, क्रेडाई एम.सी.एच.आय., देश अपनायें या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.या उपक्रमांतर्गत 6 प्रचाररथ तयार करण्यात आले असून त्यावर जिंगल्स, संवाद, निवेदन या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहतीमध्ये अँटीजेन टेस्टींग करण्यात येणार आहे त्याठिकाणी आधीच्या दिवशी जाऊन दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्टींग बाबत माहिती दिली जाणार आहे व तेथील नागरिकांची मानसिकता तयार केली जाणार आहे.यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणाऱ्या व्यक्तींच्या अँटीजेन टेस्टींगवर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच खोकला, ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या व्यक्ती स्वत:हून अँटीजेन टेस्ट करु इच्छितात त्यांचीही अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. याकरीता एखादया सोसायटी, वसाहतीमार्फत त्यांच्या येथे अँटीजेन टेस्ट करावयाची मागणी झाल्यास त्या ठिकाणीही 'ऑन कॉल अँटीजेन टेस्ट सुविधा' उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी पालकमंत्री महोदयांना दिली.कोव्हिड - 19 रुग्णांची लवकरात लवकर माहिती मिळून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी "मिशन झिरो नवी मुंबई" हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असून नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी घरापर्यंत अँटीजेन टेस्टींग उपलब्ध करुन देणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image