लेणी चे उत्खनन झाल्याखेरीज विमानतळाचे काम पूर्ण होऊ देणार नाही:- पँथर/डॉ माक्निकर


नवी मुंबई - शहरात निर्माण होणाऱ्या विमानतळ विकासकामांत वाघिवळीवाडा बौद्ध लेणी सिडको प्रशासनाकडून माती टाकून बुजविण्यात आली आहे, सदर लेणीचे उत्खनन करून अवशेषांचे जतन व लेणीचे पुनर्वसन नाही केल्यास विमानतळाचे काम पूर्ण होऊ देणार नाही असा गंभीर इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माक्निकर यांनी दिला आहे.
          लेणी आणि कोणत्याही धर्माचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असला तरी ही लेणी फक्त आणि फक्त भारताची संपत्ती असून प्राचीन भारताचा इतिहास आहे, या लेणीचे संवर्धन जतन व पुनर्वसन होणे महत्वाचे आहे.हिंदू जैन व बौद्ध अश्या जातीधर्माची मक्तेदारी न समजता केवळ भारताची धरोहर देशाची अस्मिता व आपल्या मौलिक संस्कृतीचा ठेवा संमजून लेणी बचावा साठी शासन व प्रशासनाकडे तगादा लावावा व ऐतिहासिक वास्तूचे जतंन करण्यात एकमेकांची साथ द्यावी व सिडको आणि विमान प्राधिकरण प्रशासनाला लेणीचे पुनर्वसन करण्यास भाग पाडावे असेही आवाहन डॉ माकणीकर यांनी केले आहे. पँथर ऑफ सम्यक योद्धा राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक, गड किल्ले लेणी व संविधान रक्षक आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी, पुज्य भिखु संघ यांच्या नेतृत्वात व RPI राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या मार्गदर्शनात विमानतळाचे काम पूर्ण होऊ देणार नसल्याचे सांगून  नगर विमानन मंत्री हरदीप सिंह पुरी यांना इमेल वर तक्रार केली आहे.पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांना पुढील आठवड्यात प्रकरणी एक शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचेही सांगितले आहे.लेणी अभ्यासक इतिहासप्रेमींना सदर लेणीबद्दल माहिती घ्यायची, द्यायची किंवा आंदोलनाची रूपरेषा व अधिक माहिती तसेच सहकार्यासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक महाराष्ट्र राज्य महासचिव श्रावण गायकवाड यांच्याशी 9082168375 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू