गाड्यांचे इंजिन नंबर व चेसिस नंबर बदलून विक्री करणाऱ्या टोळीला अटक 

नवी मुंबई - चोरी केलेल्या गाड्यांचे इंजिन नंबर व चेसिस नंबर बदलून त्या विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.या चोरट्यांकडून लाखो रुपयांच्या गाड्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून अजून त्यांनी किती गाड्या चोरून त्यांची विक्री केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून अटक करण्यात आलेले चोरटे हे अट्टल गुन्हेगार आहेत.
                 राकेश शिवाजी पवार (२५) व चंद्रा पुतव्या पुजारी (४२) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.दोघेही ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी असुन त्यांना रबाळे व कल्याण मधून अटक करण्यात आली आहे.या दोघांवर रबाळे, कोपरखैरणे व तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून ११ लाख रुपये किमतीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सहा.पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार केले.या पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तलय हद्दीतील वाहन चोरीचा तपशील संकलित केला.त्यानुसार चोरी झालेल्या वाहनांचे प्रकार, चोरीचे ठिकाण, चोरीची वेळ व वार यांचे वर्गीकरण करून अभ्यासपूर्ण रित्या तपास सुरु केला.त्याचवेळी रबाळे व कल्याण मधून वरील दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल माहिती समोर आली.त्यावेळी पोलिसांनी त्यांनी चोरी केलेल्या गाड्यांचा शोध घेतला.त्यात एक टेम्पो व तीन बोलोरो पीकप अश्या ११,७०,०००/- रुपये किमतीच्या गाड्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.या चोरट्याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या चोरटयांनी अजून किती गाड्या चोरून त्याची विक्री केली आहे याचा आम्ही शोध घेत असल्याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे पी आय गिरीश गोरे यांनी दिली.


 


Popular posts
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image