नवी मुंबई - कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेल्या अ.भा.वि.प च्या विद्यार्थी आंदोलकांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने त्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.अ.भा.वि.प च्या विद्यार्थी आंदोलकांची भूमिका योग्यच असल्याचे सांगून त्याचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी नवी मुंबई परिमंडळ १ चे उपायुक्त पंकज डहाणे यांची भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी भेट घेतली व डहाणे याना निवेदन दिले.
धूळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण झाली.त्यावर पोलीस बांधव व्यक्तिगत शत्रुत्व असल्यासारखे वागत आहे.असे सांगत लोकशाही मद्धे संविधानिक मार्गाने सुद्धा आंदोलन करण्याची मुभा नाही काय? नक्की कोणाचे राज्य आहे महाराष्ट्रात मोगलांचे ? की ब्रिटिशांचे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालकीची झाली आहे याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हाफत्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.उपरोक्त मागण्यांसाठी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालक मंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली परंतु असंवेदनशील पालक मंत्र्यांनी भेट नाकारली, यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना समोर स्वतः च्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला;यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली, हा प्रकार अत्यंत लाजिरवाना आहे, आशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे, कोरोना च्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे, चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे, याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयसामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा.असा इशारा घंगाळे यांनी निवेदनातून दिला असून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भर तीव्र आंदोलने करेल असेही स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात नक्की कोणाचे राज्य ,मोगलांचे की ब्रिटिशांचे