खारघरच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या


नवी मुंबई : तीन महिन्यांपूर्वी तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने पहाटे आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा एकदा खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान (43) याने क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास घेतल्याने एकच खळबळ माजली आहे.सध्या पोस्टमार्टमसाठी त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात नेला असल्याची माहिती समोर येत असून महम्मद सुलेमानच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
                तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये,यासाठी खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.त्या ठिकाणी अनेक कैद्यांना ठेवण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत.महम्मद सुलेमानही गेल्या चार दिवसांपासून इथे क्वारंटाईन होता.मोहम्मद सुलेमान यांना महसूल बुद्धिमत्ता संचालनालयाने नवी दिल्ली येथून अटक केली होती तो दंडाधिकाऱ्यांच्या ताब्यात होता. अंमली पदार्थ प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असता त्याच दरम्यान त्याने गुरुवारी दुपारी टॉयलेटमध्ये टॉवेल गाठून गळफास लावून आत्महत्या केली.यानंतर त्याचा मृतदेह जे.जे. रुग्णालय मुंबई येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.त्याने गुरुवारी एकच्या सुमारास जेलमध्येच आत्म्हत्या केली.दिल्लीतील ‘एनडीपीएस’ ड्रग्ज प्रकरणातही महम्मद सुलेमान याचा सहभाग होता.याप्रकरणात खारघर पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. . महम्मद सुलेमानच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. शौचालयात चादर अडकवून त्या कैद्याने 27 मे रोजी आत्महत्या केली होती.बालू गड़सिंगे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव होते. त्याने पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली होती. गड़सिंगे याच्यावर माजलगाव, शिवाजीनगर अशा काही ठिकाणी चार ते पाच गुन्हे दाखल होते. कलम 302 आणि 354 अंतर्गत 2017 पासून तो शिक्षा भोगत होता.


Popular posts
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
शिंदे- फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, राज्यातील सगळ्यात समाज घटकांसाठी तरतुदी
Image