कोरोना आजारातील वापरलेले हातमोजे धुऊन पुन्हा विकणाऱ्या इसमाला अटक 


नवी मुंबई - कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेले हातमोजे पुन्हा धुऊन विक्रीसाठी तयार करणाऱ्या इसमाला नवी मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सदर इसमावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वापरण्यात आलेले रबरी मोजे कोठून आणण्यात आले होते ते धुऊन कोठे वितरित होणार होते,यात एखाद्या टोळीचा सहभाग आहे का याचा नवी मुंबई गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे.
                प्रशांत सुर्वे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो सीबीडी बेलापूर या ठिकाणी राहणारा आहे.पावणे एमआयडीसी मधील गामी इंडस्ट्रियल पार्क मध्ये काही इसम कोरोना रुग्णाच्या उपचारा करीता वापरण्यात आलेले निळ्या रंगाचे हातमोजे नष्ट करणे आवश्यक असतांना बेकायदेशीरपणे ते पुन्हा धुऊन वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला.व त्या ठिकाणी चौकशी केली असता लिक्विड सोप व अन्य केमिकल्सने वाशिंग मशींगमध्ये धुऊन हातमोजे वाळवून पुन्हा ते नवीन पाकिटात पॅक केले असल्याचे दिसून आले.अश्या त्या ठिकाणी एकूण २६३ गोण्या अंदाजे ३ ते ४ क्विंटल हातमोजे आढळून आले.सुमारे ४ लाख रुपये किमतीचे असे ते हातमोजे पोलिसांनी ताब्यात घेतले.तर धुण्यासाठी आणण्यात आलेले एकूण १७ बॉक्स ही त्या ठिकाणी आढळून आले.यावर पोलिसांनी धुण्यासाठी आणण्यात आणलेले हातमोजे ,धुऊन तयार करण्यात आलेले हातमोजे दोन वाशिंग मशीन,पैकींगचे साहित्य असा एकूण ६,१०,७२०/- रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोरोना रोगाच्या वाईट परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.


Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image