नवी मुंबई महापालिका गार्डन विभागात लाखोंचा भ्रष्टाचार, कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राजे प्रतिष्ठान ची मागणी.


नवी मुंबई - महापालिका उद्यान विभागात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनात कपात करून स्वतःची पोळी भाजणाऱ्या एन के शहा इंफ्राप्रोजेक्ट या ठेकेदाराचा करोडोंचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.हा भ्रष्टाचार पालिका अधिकारी आणि सुरक्षा मंडळ अधिकारी यांच्या संगमताने सुरु असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
              शहरातील उद्यानांचे देखभाल आणि संवर्धन करण्याचे काम मनपाकडून एन के शहा इंफ्राप्रोजेक्ट या ठेकेदाराला देण्यात आले असून या ठेकेदाराच्या माध्यमातून उद्यानातील सर्व कामे करण्यात येत आहेत.तब्बल वार्षिक ३० करोड रुपयांहून अधिक रक्कम या कंत्राटदाराच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे.त्यातलाच सुरक्षा रक्षकांच्या वेतनाचा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.यावरून कंत्राटदारांच्या इतर कामावरही संशय व्यक्त होत असल्याने त्याला देण्यात आलेल्या सर्व कामाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी योगेश महाजन यांनी केली आहे.परिमंडळ १ मध्ये एकूण ८९ सुरक्षा रक्षक आणि परिमंडळ २ मध्ये एकूण ३३ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत असे ठेक्यात नमूद करण्यात आले आहे.त्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाच्या वेतन प्रणालीचा संदर्भ देण्यात आला असून त्या नुसारच कंत्राटदाराने वेतन अदा करावे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.मनपाकडून प्रती सुरक्षा रक्षक 24 हजार रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात येत असतांनाही कंत्राटदाराकडून नमो फैसिलिटी सर्व्हिसेस कंपनीच्या सुरक्षा रक्षकाना ८ हजार ते ९ हजार रुपयांप्रमाणे वेतन अदा करण्यात येत आहे.यातील फरक बघितला तर प्रति महिना १८ लाखाच्या जवळपास तर वर्षाकाठी २ कोटीहून अधिक फरक जाणवत आहे.या संबंधीची माहिती उद्यान अधिकाऱ्यांना दिली असता त्यांच्याकडूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकरणात अधिकारीही सहभागी असल्याचा संशय महाजन यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे कंत्राटदार व संबधीत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाजन यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू