विशेष शिबिरात 101 पत्रकारांची कोव्हीड 19 आर.टी.-पी.सी.आर.चाचणी


नवी मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेऊन विविध उपाययोजना राबविल्या जात असताना नवी मुंबई शहरात पत्रकारिता करणा-या विविध वृत्तपत्र व वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे सर्व पत्रकारांची कोव्हीड 19 तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. इतर अनेक अत्यावश्यक सेवेतील घटकांप्रमाणेच पत्रकारही सामाजिक भावनेतून समाजात मिसळून आपले काम करीत असतात हे अधोरेखीत करीत महापालिका आयुक्तांनी या मागणीला त्वरीत मान्यता दिली होती.त्यास अनुसरून आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून पत्रकारांकरिता कोव्हीड 19 आर.टी.-पी.सी.आर. चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास चांगला प्रतिसाद देत विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्यांमध्ये कार्यरत 101 प्रतिनिधी, कॅमेरामन यांनी आपली चाचणी करून घेतली.नवी मुंबई महानगरपालिकेची नेरूळ येथे अत्यंत अद्ययावत अशी 1000 चाचण्या प्रतिदिन क्षमतेची अत्याधुनिक आर.टी.-पी.सी.आर. प्रयोगशाळा कार्यान्वित असून 24 तासांच्या आत या चाचण्यांचे अहवाल प्राप्त होणार आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होणा-या पत्रकारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या लक्षणांनुसार योग्य आरोग्य सुविधेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. 


Popular posts
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image