येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर 1857 प्रमाणे क्रांती होईल : छत्रपती उदयनराजे भोसले 


मुंबई : मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्याला आता वेगळेच वळण लागले आहे.या प्रकरणाला राजकीय वळण न देता जनसामान्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे,आणि असे होत नसेल तर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने केलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असं उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का राहावं ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
                  येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर 1857 प्रमाणे क्रांती होईल आणि त्याचे गंभीर पडसाद उमटतील असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच मागील मोर्चे शांततेत निघाले, मात्र आता जे मोर्चे निघतील ते शांततेत निघणार नाही, असंही ते म्हणाले. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगिती का मिळाली या तपशीलात मला जायचं नाही. पण कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये. समाज म्हटलं की वेगवेगळ्या जातीजमातीची लोकं असतात. मराठा समाजावर का अन्याय होतोय ? उद्या लोक प्रश्न विचारायचं सोडून देतील आणि काय करतील मला सांगता येत नाही. मागे जे मार्चे निघाले ते शांततेत निघाले, आता जे मोर्चे निघाले ते शांततेत निघणार नाही. त्याचा परिणाम स्वतःला फार मोठा पक्ष समजणाऱ्या पक्षांना समजेल. लोक काय करतील मी सांगू शकत नाही.उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासावरही आक्रमक झाले. ते म्हणाले, “मला वाटतं तोडगा काढण्याची वेळ आता संपली आहे. ज्यांना आरक्षण द्यावं वाटत होतं ते मागेच द्यायला हवं होतं, नाहीतर परिणामांना सामोरं जावं. परिणाम काय होतील हे पदांवर असणाऱ्यांना विचारा. कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार असो त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लावला नाही. लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. या प्रश्नावर मला संताप येतोय. जर मला संताप येत असेल, तर ज्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न आहे त्यांना किती संताप येत असेल. माझ्यासह कुणालाही विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ करण्याचा अधिकार दिलेला नाही.“माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर असतो. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते कोणीही असो. मला कोर्टाचा अवमान करण्याची इच्छा नाही. पण कोर्ट म्हणजे काय मला हे कळालंच नाही. कोर्ट म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. निर्णय देताना त्यांनी मनाने विचार केला पाहिजे, त्यांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे,” असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं आहे.“मराठा आरक्षणावरुन माझी अनेकांशी चर्चा सुरु असून यामध्ये राजकारण आणलं जाऊ नये. इतरांप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. ओघाने मी मराठा आहे, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित ठेऊ नका,” अशी विनंती यावेळी उदयनराजेंनी केली आहे. “आरक्षण नाही मिळालं तर उद्रेक होईल याची जास्त भीती वाटते,” असं ते म्हणाले आहेत.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image