इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' या योजनेअंतर्गत 50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' 


इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' या योजनेअंतर्गत 50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' 


नवी मुंबई - कोरोना विरोधातील लढाईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना कोरोना बाधितांचा शोध, तपासणी, उपचार कार्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभांगातील अधिकारी, कर्मचारी अथक काम करीत आहेत. या अधिकारी, कर्मचारी यांना काम करताना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त अभिजीत बांगर यांचे कटाक्षाने लक्ष असून कोरोना बाधित होणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा उपचार कालावधी व बरे होऊन वैद्यकीय सल्ल्याने कामावर रूजू होण्याचा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.


            त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेतील जे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड 19 शी संबंधित काम करीत असताना दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडतात त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' या योजनेअंतर्गत 50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून 25 लक्ष अशी एकूण 75 लक्ष रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे आरोग्य सेवेव्यतिरिक्त महानगरपालिका आस्थापनेवरील कोरोना विषयक सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य या कार्यवाहीच्या कर्तव्यावर असणा-या  अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"तून रुपये 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विमा कवच योजना समितीच्या 25 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये 2 दिवंगत वाहनचालक कर्मचारी यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' योजने अंतर्गत 50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' बँकेव्दारे मिळणेबाबतची पुढील कार्यवाही करणे व त्यांचे वारस तपासून महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून प्रत्येकी 25 लक्ष रक्कमेचे विशेष सानुग्रह अनुदान देणेस मंजूरी देण्यात आली. तसेच दिवंगत कनिष्ठ अभियंता यांच्या वारसास महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"तून रुपये 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.त्यानुसार दिवंगत वाहन चालक संभाजी भास्कर यशवंतराव यांच्या पत्नी जयश्री संभाजी यशवंतराव यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून 25 लक्ष रक्कमेचा धनादेश अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इतरही दोन कर्मचा-यांच्या वारसांना विशेष सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान करण्यात येत आहे.


कोट - कोविड १९ योद्ध्यांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने मदत करावी या नमुमपा कर्मचारी अधिकारी संघटनेच्या मागणी व प्रयत्नांना आज अखेर न्याय मिळाला आयुक्त बांगर साहेब व अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त प्रशासन चाबुकस्वार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 
विजय पाटील - अध्यक्ष, नमुंमपा कर्मचारी अधिकारी संघटना


 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image