शहर स्वच्छतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव


नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम व देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक आहे.यामध्ये दररोज शहर स्वच्छ ठेवून नियमित योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. त्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सन्मान करणारा हा कार्यक्रम मनाला समाधान देणारा असल्याचे मत मांडत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यापुढील काळात आपण सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार व्यक्त केला.नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने आयोजित स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.
                 यावेळी अतिवृष्टीमुळे मागील वर्षी कोल्हापूर भागात उद्भवलेल्या आपत्ती प्रसंगात चांगली कामगिरी करणा-या स्वच्छताकर्मींचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, कार्यकारी अभियंता  संजय देसाई, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आपण करीत असलेल्या चांगल्या कामाची नोंद घेऊन करण्यात येणारा सत्कार हा आपल्याला अधिक चांगले काम करण्याची उमेद देणारा असतो असे सांगत या सत्कारातून प्रेरणा घेऊन आपण शहरासाठी अधिक चांगले काम करूया असे सर्वांना आवाहन केले. कोल्हापूरमध्ये जाऊन तेथे आपले शहर समजून काम केल्याने तेथील नागरिकांसह सर्वांनीच कौतुक केलेल्या नवी मुंबईतील स्वच्छताकर्मींच्या सर्वसमावेशक मनोभूमिकेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.कोल्हापूरला गेलेल्या 80 जणांच्या मदतकार्य पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी तेथील आव्हाने, संकटे व त्यावर जिद्दीने केलेली मात याबद्दलचे अनुभव कथन केले.यावेळी 5 अधिकारी आणि 180 सफाई कर्मचारी यांचा भेटवस्तू व प्रशस्तिपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूरला गेलेल्या मदतकार्य पथकात उल्लेखनीय कामगिरी करणारे दिवंगत उप स्वच्छता निरीक्षक सत्यजित देवधर यांच्या पत्नीने त्यांच्या वतीने सन्मान स्विकारताना उपस्थितांनी उठून उभे रहात देवधरांच्या समर्पित कार्याला आदरांजली अर्पण केली.अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत होत असलेला आमचा मानसन्मान मनाला आनंद देणारा असून यापुढील काळात अधिक चांगले काम करून नवी मुंबईला देशात आघाडीवर नेऊ असा निश्चय केला असल्याचे मत अनेक सफाई कर्मचा-यांनी व्यक्त केले. 


Popular posts
विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई, बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image