सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास २८ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई - सिडकोच्या २०१८ मधील गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास २८ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. कोविड-१९ व त्या अनुषंगाने सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
                    सिडकोच्या २०१८ मधील गृहनिर्माण योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांसाठी नवी मुंबईतील ५ नोडमध्ये एकूण १४,८३८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेची संगणकीय सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी यशस्वीरीत्या पार पडली होती. कोविड-१९ मुळे लागू करण्यात आलेली देशव्यापी टाळेबंदीमुळे शुल्क भरण्यास येणाऱ्या अडचणी, आर्थिक समस्येचा करावा लागणारा सामना तसेच सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असणे, या बाबींचा विचार करून यापूर्वीच सदनिकांचे हफ्ते भरण्यास ३० जून २०२० व त्यानंतर २९ सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, सदनिकांचे हफ्ते भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अर्जदारांकडून करण्यात आल्याने सिडकोतर्फे आणखी तीन महिन्यांची म्हणजे २८ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने जाहीर केलेल्या मुदतवाढीच्या निर्णयानुसार ज्या अर्जदारांनी वाटपपत्रात नमूद एक ते चार हफ्त्यांपैकी कोणत्याही हफ्त्याची रक्कम भरली असेल अशा अर्जदारांना आणखी तीन महिने म्हणजेच एकूण नऊ महिने मुदतवाढ (२४ मार्च २०२० ते २८ डिसेंबर २०२०) देण्यात येऊन टाळेबंदीच्या सुरुवातीपासून २४ मार्च २०२० ते २८ डिसेंबर २०२० पर्यंत विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. ज्या अर्जदारांनी यापूर्वीच वाटपपत्रात नमूद एक ते चार हफ्त्यांची पूर्ण रक्कम भरली असेल व टाळेबंदीच्या कालावधीमध्ये ज्यांना पाचवा व सहावा हफ्ता भरणे शक्य झाले नसेल, अशा अर्जदारांनादेखील आणखी तीन महिन्यांची म्हणजेच एकूण नऊ महिन्यांची (२४ मार्च २०२० ते २८ डिसेंबर २०२०) मुदतवाढ देण्यात आली असून कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. ज्या अर्जदारांनी वाटपपत्रानुसार पहिल्या हफ्त्याच्या दिनांकापासून म्हणजे २४ ऑक्टोबर २०१९ पासून अतिरिक्त दिलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच २९ सप्टेंबर २०२० पर्यंत कोणत्याही रकमेचा भरणा केलेला नाही अशा अर्जदारांचे वाटपपत्र रद्द करण्यात येणार आहे,


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू