पुणे पदवीधर मतदार संघात नवीन चेहरा ठरणार आकर्षक


नवी मुंबई - कोरोना काळात लांबलेल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच होणार आहे.त्यासाठी सर्वच पक्षांची आपआपली दावेदारी या मतदारसंघात आजमवण्यास सुरवात केली आहे.तिकिटासाठी उमेदवारांची जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे.महाविकास आघाडी कडून कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अद्याप निश्चित नसले तरी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी येथे सर्वाधिक जास्त इच्छुक आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.भारतीय जनता पार्टी सुद्धा पुन्हा एकदा महाविकास आघाडी ला टक्कर देण्यास तयार असली तरी नेमकी महत्वाची भूमिका कोणाची असणार याची चर्चा सुरु झाली आहे.त्याचवेळी नुसतं पक्ष नाही तर काही अपक्ष चेहऱ्यांनी सुद्धा चेहरा नवा बदल हवा असा नारा देऊन पदवीधर मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करून धक्का देण्याची परिस्थिती निर्माण केली आहे..यामध्ये अजय येवले या उच्च शिक्षित तरुणांने पदविधर युवकांच्या जास्तीत जास्त नोंदणी करण्यावर भर देऊन अनेक युवकांच्या हिताची कामे करण्याचा सपाटा लावला आहे.टाळेबंदी च्या काळात गरजवंत विद्यार्थ्यांना किराणा सामानाची किट असो किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था असो या सर्वच गोष्टी मध्ये अजय येवले यांनी सक्षम रित्या काम केले आहे..पदवीधर युवकांच्या अनेक अडचणी आहे त्या आतापर्यत कोणत्याही पदीवधर आमदाराने सोडवल्या नाहीं.या नाराज पदवीधर युवकांचा पाठींबा अजय येवले यांना विजयाचे वरदान ठरवू शकतो.अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.


Popular posts
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image