रेशनचा ३८० मेट्रिक टन काळ्या बाजारातील तांदूळ साठा जप्त 


नवी मुंबई : कोरोना काळात गोरगरीब जनतेला देण्यात येणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या अजून तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती.यावेळी ३८० मेट्रिक टन काळया बाजारातील तांदूळ साठाही जप्त करण्यात आला आहे.गत महिन्यात पनवेल पोलिसांनी टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील रेशन दुकानात छापा मारला असता ११० टन तांदूळ साठा जप्त केला करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.याच गुन्ह्याचा तपास सुरु असतांना अजून तिघे जण आणि मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारातील तांदूळ सापडला आहे.
                  नवनाथ लोकू राठोड (२५),सत्तार चांदसाहेब सय्यद (२५) व कृष्णा दामो पवार (४५) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.हे तिघेही कर्नाटक मधील रहिवाशी आहेत.त्यांच्याकडून रेशनच्या तांदुळाच्या ५० किलोच्या २२२० गोण्या ,त्यामध्ये एशियन राईस लोगो असलेल्या ६५२ पिवळ्या रंगाच्या व पांढऱ्या रंगाच्या २९५ गोण्या तर उर्वरित १२७३ शासकीय ,दोन वजन काटे असा एकूण ३३,००,००० /- रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे.या तिघांनी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणावरून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा तांदूळ आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच त्यांनी विविध कंपन्या मार्फत भारतीय खाद्य निगमच्या ओएमएसएस मधील ई लिलावाद्वारे तांदूळ घेऊन तो निर्यातीवर बंदी असतानाही विविध आफ्रिकन देशात निर्यात केला आहे.नवनाथाने आता पर्यंत ३२,८२७ मेट्रिक टन तांदूळ निर्यात केल्याचे तपासात उघड झाले आहे.हा तांदूळ त्यांनी कोठून आणला याचा पोलीस तपास करत आहेत.यापूर्वी पोलिसांनी याच प्रकरणात भीमाशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना या कारवाईत 33 लाख 8 हजार किंमतीचे तांदूळ मिळाले आहेत. पोलिसांना रेशनिंग तांदळाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या एकूण 2 हजार 220 गोण्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या गोण्यांवर पंजाब सरकार, हरियाणा सरकार, एशियन राईस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे शिक्के आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटेदेखील हस्तगत केले आहेत.पनवेलमधील टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील रेशन दुकानात तांदळाचा काळाबाजार होत असल्याची माहिती उपायुक्त अशोक दुधे आणि पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस, ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊन येथे जाऊन दोन पंचासमक्ष छापा टाकला.त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असता त्या पथकाच्या माध्यमातून वरील प्रकार उजेडात आला आहे.


 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image