तज्ञ कर्मचारी नसतील तर जम्बो कोविड सेंटरला काय अर्थ - आमदार गणेश नाईक 

नवी मुंबई - केवळ जम्बो कोविड सेंटरची निर्मिती करून काहीही साध्य होणार नाही या सेंटरमधून तज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यावश्यक आहे अशी सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे.लोकनेते नाईक यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंध संबंधी आयुक्त बांगर यांच्यासोबत नियमित आढावा बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आणखी काही महत्त्वाच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या.
                    नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. या राज्यांमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर नर्सेस आणि इतर वैद्यकीय तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती राज्याच्या आरोग्य सचिवांमार्फत घेऊन तशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवी मुंबईतील विविध कोरोना सेंटरमध्ये करावी असा सल्ला त्यांनी या बैठकीत दिला.कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या आपल्या रुग्णावर आपुलकीचे योग्य ते उपचार मिळतील तो बरा होऊन घरी परतेल अशी आशा त्याच्या नातेवाईकांना असते. परंतु अनेक वेळा कोरोना सेंटरमधून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत.रुग्णांच्या प्राथमिक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने हे रुग्ण ऑक्सिजन'वर आणि त्यानंतर व्हेंटिलेटरवर जातात.कोरोना रुग्णांना सातत्याने नजरेखाली ठेवण्याची गरज आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र मॉनिटरिंग व्यवस्था करण्याची मागणी लोकनेते नाईक यांनी केली ती आयुक्तांनी मान्य केली. रुग्णांच्या सुरुवातीच्या त्रासाकडे लक्ष दिले नाही तर संबंधित रुग्ण मृत्यूच्या दाराशी कधी पोहोचतो हे देखील कळत नाही त्यामुळे कोरोना सेंटरमध्ये रुग्णांच नियमित मॉनिटरिंग करण्याची बाब माजी आमदार संदीप नाईक यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. वाशी येथील पालिका रुग्णालय कोरोनामुक्त करण्याची मागणी नाईक यांनी केली होती. त्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने आरंभली असून रुग्णालयाच्या दोन मजल्यांवर बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित केला आहे 21 सप्टेंबर पासून ओपीडीमध्ये रुग्ण तपासणीचे काम सुरू होणार आहे आणि सप्टेंबर अखेरपर्यंत हे रुग्णालय पूर्णपणे इतर सर्व आजारांवर उपचारासाठी खुले होणार आहे.खबरदारीचे पालन न करणे मास्क न वापरणे स्यानीटायझरचा  वापर न करणे अशा कारणांमुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होतो आहे. त्याचा संसर्ग वाढू नये याकरता जनहितासाठी जे लोक मास्क लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसुली करण्यास हरकत नाही असं मतही नाईक यांनी यावेळी मांडले.आढावा बैठकीप्रसंगी आमदार नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ, माजी नगरसेवक दशरथ भगत, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, माजी नगरसेवक मुनावर पटेल, माजी नगरसेवक अमित मेढकर, माजी नगरसेविका सायली शिंदे, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, माजी नगरसेवक दीपक पवार, समाजसेवक नारायण शिंदे, समाजसेवक राजेश ठाकूर, शिक्षण समितीचे माजी सभापती सिंगवी जयंत हुद्दार आदी मान्यवर उपस्थित होते .


Popular posts
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image