खाजगी रूग्णालयातील कोव्हीड उपचारांविषयी बिलांच्या तक्रार निवारणासाठी विशेष केंद्र स्थापन

 


खाजगी रूग्णालयातील कोव्हीड उपचारांविषयी बिलांच्या तक्रार निवारणासाठी विशेष केंद्र स्थापन


नवी मुंबई - खाजगी रूग्णालये शासनाने जाहीर केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने नागरिकांना सुलभपणे विनासायास आपली तक्रार नोंदविता यावी व त्यावर विहित वेळेत योग्य कार्यवाही व्हावी याकडे आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून आकारण्यात आलेल्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी "कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)" कार्यान्वित करण्यात येत आहे. याकरिता 022-27567389 हा दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप क्रमांक नागरिकांच्या सुलभ संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


                          महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 21 मे रोजीच्या अधिसूचनेनुसार कोव्हीड 19 संसर्ग बाधित रूग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या बॉम्बे नर्सिंग होम (अमेन्डमेंट) ॲक्ट 2006 नुसार नोंदणीकृत 'हेल्थ केअर प्रोव्हायडर ( विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना मार्गदर्शक सूचना पारीत केल्या आहेत व त्यामधील प्रपत्र 'सी' मध्ये रूग्णालयीन उपचारांकरिता आकारावयाचे बाबनिहाय दर देखील जाहीर केले आहेत. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही साथरोग नियंत्रक सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका आयुक्त यांचे स्वाक्षरीने 18 ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना रूग्णांना देण्यात येणा-या सेवांबाबत मार्गदर्शक सूचनांचे आदेश दिलेले आहेत.तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन होऊन रूग्णांच्या देयकात जास्तीचे दर आकारून बिले दिली जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत आहेत. त्याचे निराकरण तत्परतेने करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीत तळमजल्यावर 7 सप्टेंबर पासून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत 'कोव्हीड बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Center)' सुरू करण्यात येत आहे. या विशेष केंद्राकरिता 022-27567389 या हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोव्हीड बिलांविषयीच्या तक्रारीसाठी त्यावर संपर्क साधू शकतील. या केंद्रातील कर्मचारी संपर्क साधणा-या व्यक्तीकडून रूग्णाचे नाव, तक्रारदाराचे नाव, मोबाईल व संपर्कध्वनी क्रमांक, रूग्णाचा पूर्ण पत्ता, रूग्णालयाचे नाव व पत्ता, रूग्णालयात दाखल दिनांक, रूग्णालयातून डिस्चार्ज दिनांक, रूग्णालयाने आकारलेल्या बिलाची रक्कम व तक्रारीची संक्षिप्त माहिती विचारतील. त्यानंतर तक्रारदार व्यक्तीस cbcc@nmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा 7208490010 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठविणेबाबत सूचित केले जाईल. या प्रती प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारास विशिष्ट टोकन क्रमांक दिला जाईल.अशाप्रकारे बिलांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींवर महानगरपालिकेच्या वतीने 24 तासांत योग्य ती कार्यवाही केली जाईल व सदर कक्षाकडून तक्रारदाराला तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीविषयी माहिती देण्यात येईल. याशिवाय तक्रारदार आपल्या टोकन क्रमांकाचा संदर्भ देऊन आपल्या तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती या केंद्राकडून उपलब्ध करून घेऊ शकेल.खाजगी रूग्णालयातील बिलांबाबतच्या तक्रारी नागरिकांना सुलभतेने नोंदविता याव्यात व त्यावरील कार्यवाही विहित वेळेत व्हावी आणि त्याची माहिती तत्परतेने तक्रारदारास उपलब्ध व्हावी याकडे काटेकोर लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार हे 'कोव्हीड बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)' दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे. 


Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image