अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?

अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ?

नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ?

नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?

नवी मुंबई (योगेश महाजन) :- महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या कारकिर्दीत अनेक घोटाळे समोर आले असून त्यातच आता अजून एक शिक्षण विभागातील २० ते २५ करोड रुपयांचा घोटाळा समोर आला आहे.एकीकडे करार पद्धतीवरील कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत असतांनाच त्याअगोदरच शिक्षण विभागातील अपात्र शिक्षकांसह १६१ शिक्षक कायम होण्याच्या मार्गावर आहेत. मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनीही या प्रकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या अपात्र शिक्षकांचा कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कायम होण्यासाठी प्रति शिक्षक १७ ते १८ लाख रुपये घेण्यात येत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.जर ठोक मानधनावरील शिक्षक कायम होत असतील तर करार पद्धतीवरील काम करणारे ४९७ कर्मचारी का कायम होऊ शकत नाही अशी चर्चा सुरु आहे.

            सन २०११ - २०१२ शिक्षण सेवक संवर्गातील पदे भरतीत जे शिक्षक अपात्र झाले, व कोणत्याही निवड प्रक्रियेविना जे शिक्षक करार पद्धतीवर पालिकेत आहेत त्यांनाच पुन्हा सेवेत घेत आता कायम करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.तर सन २०११ - २०१२ जे ठोक मानधन, थेट नियुक्ती अथवा जाहिरातीद्वारे भरती झाले त्यांना आता कायम करण्यात यावे यासाठी मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे.त्याचवेळी करार पद्धतीवरील काम करणाऱ्या त्या ४९७ कामगारांवर अन्याय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नवी मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाकडून शिक्षण सेवक संवर्गातील पदे भरण्यासाठी २०११ रोजी जाहिरात प्रसिदध करण्यात आली होती.त्या जाहिरातीनुसार शिक्षण सेवक पदासाठी हजारो अर्ज आले होते.त्यावेळी भरतीसाठी आलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या असत्या, त्यातील अनेकांना अपात्र करण्यात आले तर जागा रिक्त नसल्याने काही जणांची निवड करण्यात आली नाही.जे अपात्र झाले अथवा ज्यांची निवड झाली नाही त्यांना कालांतराने ठोक मानधनावर शिक्षण सेवेत सामावून घेण्यात आले.ज्यांना शिक्षण सेवेत सामावून घेण्यात आले त्यांना १२ ते १३ वर्ष सेवेत झाल्याने आता कायम करण्यात यावे अशी मागणी त्यांच्याकडून होऊ लागली आहे.वेळोवेळी अभ्रासक्रमात होणारे बदल,मुलांमध्ये होणारे बदल यावर कितपत हे अपात्र शिक्षक नियंत्रण मिळवू शकतील यावर प्रश्नचिन्ह आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार पवित्र पोर्टल व इतर अधिकृत कार्यपद्धती अंमलात असतांना व त्याच पद्धतीने नेमणूक होणे आदेशित असतांना शिवाय राज्यात मोठ्या प्रमाणावर पात्र व सक्षम उमेदवार उपलब्ध असतांना आयुक्त चुकीचा पायंडा पाडत या शिक्षकांना का कायम करत आहेत अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.प्रति शिक्षकाकडून सुमारे १७ ते १८ लाख घेतल्यावर शिक्षण विभागात सुमारे १४ ते १५ वर्ष कार्यरत असलेल्या लिपिकापासून,शिक्षण अधिकारी,शिक्षण उपायुक्त,अतिरिक्त आयुक्त तसेच नगरविकास विभागात हे १७ ते १८ लाख प्रति शिक्षकांकडून घेण्यात येणारी रक्कम वाटप होणार असल्याची चर्चा आहे.या पूर्ण प्रस्तावाला आयुक्त कैलास शिंदे यांनीही दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मान्यता दिली आहे.मनपाच्या प्रत्येक विभागात करार पद्धतीवर ४९७ कामगार काम करत आहेत. त्यांना कायम करण्याऐवजी प्रशासन विभागाकडून ६२० पदांसाठी नव्याने भरती काढण्यात आली आहे.त्यांच्यावर अन्याय का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जर लाखो रुपये भरून कायम होता येत असेल तर आमचीही तयारी असल्याची चर्चा करार पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. १५ एप्रिल २०२५ च्या आयुक्त यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून मान्यता आल्यावर एकच प्रश्न पडतो की अपात्र शिक्षक खरच नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना न्याय देतील का,अपात्र शिक्षकांमुळे तयार झालेली नवी मुंबईतील मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची पुढची पिढी कशी असेल.आयुक्तांनी सही केलेल्या वरील प्रस्तावात ७ शिक्षक हे कोणत्याही जाहिरात वा निवड प्रक्रियेविना असूनसुद्धा त्यांना कायम करण्यासाठी आयुक्तांची ही  धडपड उर्वरित ४९७ कायम कर्मचाऱ्यांसाठी राहील का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.  


जाहिरात वा कोणत्याही निवड प्रक्रियेविना प्रस्तावातील कायम होणारे शिक्षक

१) रेखा भरत यादव

२) हिमांशू गिरीजा शंकर सिंह

३) दिलीप लालताप्रसाद मिश्रा

४) संगीता दिनेश नगराळे

५) राजकुमार सदाशिव खाडे

६) नयना किसन म्हात्रे

७) कांचन महादेव देशमुख

या कायम होणाऱ्या सात करार शिक्षकांचे जाहिरात वा निवड प्रक्रियेची माहिती शिक्षण विभाग व महापालिका प्रशासन देईल का.याच प्रमाणे उर्वरित ४९७ करार कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का ?


अनु क्र    मुलाखत क्र    नाव                           शेरा  

१)           २८७             झावरे जयश्री गंगाधर - अपात्र

२)           १४०८            म्हात्रे अरुण गजानन - अपात्र

३)           १४२४           साबळे स्मिता नारायण - अपात्र

४)           ११६४           भास्कर जनाबाई महादेव - अपात्र

५)           १४१३            मोहिते पिंकी शंकर - अपात्र

६)           १२०३            पाटील सारिका बबन - अपात्र

७)           १३०              मोकाशी दीपाली बाळू - अपात्र

८)            १२०६          तांदळे भागवत वसंत - अपात्र

९)            १४२३          पाटील योगिता साहेबराव - अपात्र

१०)           ५३४           शिरसाठ अरुणा श्यामराव - अपात्र

११)            ५४७         बारवे रुपाली जयसिंग - अपात्र  

( सन २०११ - २०१२ मध्ये अपात्र करण्यात आलेल्या शिक्षकांची यादी )

हे अपात्र शिक्षक पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे काय भविष्य घडवणार ?

हे अपात्र शिक्षक जर आयुक्त कायम करत असतील तर वर्षोनुवर्षे पालिकेच्या इमानेइतबारे सेवा करणाऱ्या ४९७ कर्मचाऱ्यांना का कायम केले जात नाही.


कायम होण्यासाठी पालिका वर्तुळात चर्चेत असलेले दर

प्रस्ताव बनवण्यापूर्वी (प्रति शिक्षकाकडून ) - १,५०,००० /-

प्रशासकीय मंजुरी नंतर (प्रति शिक्षकाकडून ) :- ५,००,०००/-

मंत्रालय मान्यतेनंतर (प्रति शिक्षकाकडून ) :- ५,००,०००/-

कायम नंतरचा पहिला पगार (प्रति शिक्षकाकडून ) :- ५,००,०००/-

वरील रकमेची चर्चा ही पालिका वर्तुळात सुरु असून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी होत आहे.


दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी आयुक्तांनी मान्यता दिलेल्या या प्रस्तावात दिव्यांग प्रवर्गाचे आरक्षण न ठेवल्याने दिव्यांग प्रवर्गावर अन्याय करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.


Popular posts
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image