मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा - हाजी शाहनवाज खान 

 



नवी मुंबई - राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कर्ज योजना, व्यवसाय परीक्षण व अन्य योजना राबविण्यासाठी सन २००० मध्ये मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व गरीब व गरजूंना लघुउद्योग व व्यवसाय करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जातात.परंतु मागील काही वर्षांपासून महामंडळाच्या योजनांवर पुर्णपणे अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे तत्काळ या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी ए आय एम आय एम कोकण निरीक्षक, विद्यार्थी संघटना हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.


                   मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिक सक्षमीकरण करुन त्या माध्यमातून अल्पसंख्याक तरुणांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.महामंडळाचे प्राधिकृत भागभांडवल १५०० कोटी रुपये पर्यंत वाढवण्यात यावे.मौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जाते या योजनेत कर्जाची मर्यादा २.५० लाख इतकी आहे परंतु सद्याच्या काळात उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च पाहता ही रक्कम खुप कमी आहे जेणेकरून शैक्षणिक कर्ज योजनेची कर्ज मर्यादा १५ लाख करण्यात यावी तसेच उत्पन्नाची अट २.५० पासून किमान १० लाखापर्यंत करण्यात यावी, परतफेड मुदत ८ वर्ष करण्यात यावी व Income Tax भरणाऱ्या ही जामीनदाराची अट रद्द करण्यात यावी.महामंडळामार्फत लघुउद्योग व छोटेमोठे व्यवसाय करण्यासाठी "उन्नती मुदत कर्ज योजना" ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५००० ते ५ लाखापर्यंत ची रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. परंतु सद्याच्या काळात व्यवसाय करण्यासाठी ही रक्कम पुरेसी नाही त्यामुळे या योजनेत कर्ज मर्यादा ५०००००० पन्नास लाखापर्यंत वाढवण्यात यावी तसेच या योजनेसाठी उत्पन्नाची अट शहरी भागासाठी १.२० लाख रुपये व ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपये इतकी आहे तर उत्पन्नाची अट किमान १० लाखापर्यंत वाढवण्यात यावी व परतफेड ची मुद्दत ५ वर्ष एवजी ७ वर्ष करण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त गरजूंना या योजनेचा लाभ घेता येईल.अल्पसंख्याक समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी "सुक्ष्म पतपुरवठा योजना" राबवली जाते. या योजने अंतर्गत नामांकित बचत गटांना २ लाखापर्यंत कर्ज स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. तरी या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ५ लाखापर्यंत करण्यात यावी व परतफेड कालावधी ३६ महीने एवजी ४८ महिने करण्यात यावी.महामंडळामार्फत " थेट कर्ज योजना " राबवली जात होती परंतु काही वर्षांपासून या वर अंमलबजावणी होत नाही. या योजने मुळे गरीब व गरजू अल्पसंख्याकांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मदत भेटत होती. तत्काळ ही योजना राबविण्यात यावी व या योजने ची कर्ज मर्यादा १.५० लाखापर्यंत वाढवण्यात यावी.पात्र अर्जदाराचा अर्ज एका महिन्याच्या कालावधीत निकाली काढून रक्कम त्यांच्या बँक खातेत जमा करण्यात यावी.राज्यातील सर्व जिल्ह्यात महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात यावे व प्रत्येक कार्यालयात दोन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. तसेच जिल्हा कार्यालयात कामात हलगर्जी करणाऱ्या व अर्जदारांकडून पैसे ची मागणी करणाऱ्या कर्मचारी वर कडक कारवाई करण्यात यावी.लवकरात लवकर महामंडळावर संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी.सध्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे व कोरोना संकटामुळे सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे जेणेकरून लोकांना मदतीची अत्यंत गरज आहे.त्यामुळे लवकरात लवकर वरील मागण्या तत्काळ मंजूर करून कडक अंमलबजावणी करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.


Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळात एकूण १५ निर्णय घेण्यात आले., ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प , पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प , बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद 3 ऑक्टोबर रोजी
Image