उरण - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार यांना वाढत्या बेरोजगारी व वर्षांची २ कोटी नवे रोजगार या गंभीर प्रश्नांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.सध्याच्या कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार गेले. व बेरोजगारीचे भिषण संकट सद्यस्थितीत उभे राहिले आहे. या सर्व बाबीं गांभीर्याने घेऊन व युवकांचे भविष्य लक्षात घेऊन तात्काळ रोजगार निर्मिती करावी व युवकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे चिटणीस निखिल नरेंद्र डवळे, उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत ,रायगड जिल्हा सरचिटणीस जितेश म्हात्रे, उरण विधानसभा सरचिटणीस विवेक म्हात्रे,उरण शहर अध्यक्ष अब्दूल शिलोत्री,चिटनीस आदित्य घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसिलदारांना रोजगार प्रश्नांवर निवेदन देऊन महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक
• Yogesh dnyneshwar mahajan