मनपाच्या कोरोना उपचारातील गलथान कारभाराला मनसेचा यमदूत पुरस्कार 


नवी मुंबई - मनपाच्या गलथान कारभारामुळे कोरोना संक्रमित रुग्णांना उपचार करताना जीव गमवावा लागत आहे.या विरोधात नवी मुंबई मनसेकडून नवी मुंबई मनपा आरोग्य विभागाला यमदूत पुरस्कार आणि कु सन्मान पत्र अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करून मनपाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. 
                ऐरोलीतील शांती नायक यांचा मृत्यू आरोग्य विभागाच्या गलथान काराभरामुळेच झाला असून याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.तर कोरोना संक्रमण काळात एकूण 630 मृत्यू झाले असून याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.या आंदोलनात कोरोनाच्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूला सामोरे जावे लागल्याने मनपाच्या आवारात श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.यावेळी मनसेचे नवी मुंबई  उपशहर अध्यक्ष - निलेश बाणखेले - विनोद पार्टे, बाळासाहेब शिंदे, न.मुं  सहसचिव - नितीन लष्कर ,विभाग अध्यक्ष - प्रविण घोगरे पाटील, विभाग अध्यक्ष, भुषण आगीवले - विश्वनाथ दळवी, तुर्भे - मयुर चव्हाण,  उपविभाग अध्यक्ष - संतोष जाधव, संदिप सिंग, कल्पेश बेलोसे, संजय खंडाळे,  मनवीसे - राज कुडाळकर, शुभम राऊत सह पप्पू शिंदे, संदीप साठे आदी उपस्थित होते.