होम लोन ,पर्सनल लोन, बिजनेस लोनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक 

होम लोन ,पर्सनल लोन, बिजनेस लोनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक 
नवी मुंबई - होम लोन ,पर्सनल लोन, बिजनेस लोन कमी वेळात, कमी व्याजदरात व कमी कागदपत्रात करून देतो असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.या टोळीने नवी मुंबई सह इतर जिल्ह्यातील अनेकांना लोनच्या नावाखाली गंडा घातला असून त्या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.या तिघांवर  एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                    निलेश म्हात्रे, रोहित नागवेकर व भालचंद्र पालव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.हे तिघेही स्वस्तिक फायनांन्स सर्व्हिसेस च्या नावाखाली सामान्य नागरिकांना फसवत होते.गत महिन्यात निलेश म्हात्रे स्वस्तिक फायनांन्स सर्व्हिसेसचे हॅण्डबील वर्तमानतपत्रात टाकण्यासाठी नेरुळ सेक्टर ६ या ठिकाणी आला असता त्या ठिकाणी त्याची ओळख योगेश महाजन यांच्याशी झाली.त्यावेळी लोन संदर्भात महाजन यांनी म्हात्रे यांच्याकडे विचारणा केली असता कागदपत्रे दिल्यावर सात दिवसांच्या आत लोन पास करून देतो असे त्याने सांगितले.त्याचवेळी लोन साठी लागणारी शेअर्स सर्टिफिकेटची फी मात्र अगोदर द्यावी लागेल असेही त्यांनी सांगितले.त्यावर वाशी सेक्टर १८ पेट्रोल पंप जवळ लोन साठी कागदपत्रे घेऊन बोलावले असता  असता त्या ठिकाणी निलेश व रोहितने महाजन यांच्याकडून विजयदीप सहकारी संस्था मर्यादित (डहाणू) च्या नावाचे अर्ज भरून घेतले.व १८७५०/- रुपयांची शेअर्स सर्टिफिकेटची फी मागितली.त्याचवेळी संशय आल्याने महाजन यांनी रक्कम देण्यास नकार दिला.नंतर देतो असे सांगितले.त्यानंतर दोनच दिवसांनी तुमचे १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगत तुम्हाला मंजुरी पत्र देतो त्याचवेळी शेअर्स सर्टिफिकेटची फी द्या अशी मागणी म्हात्रे यांनी महाजन यांच्याकडे केली.त्यावेळी ८७५० रुपयांची रक्कम त्यांना दिली असता दोघांनी विजयदीप सहकारी संस्था मर्यादित (डहाणू) चे कर्ज मजुरी पत्र दिले.या संस्थेची शहनिशा केली असता ती अस्तित्वातच नसल्याची बाब निदर्शनास आली.यावर महाजन यांनी निलेश व रोहित यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या अनुषंगाने एपीएमसी पोलीस ठाण्याचे  पो.नि.भुषन पवार,पो.हवा.चंद्रकांत कदम,पो.ना.जयपाल गायकवाड़,पो.ना.सचिन ठोबंरे,पो.ना.सुनिल पवार,पो.ना संदेश म्हाञे,पो.ना.अमोल भोसले या पथकाने युद्धपातळीवर वरील भामट्यांचा शोध घेतला आणि त्यांना मंगळवारी दुपारी जुईनगर मधून अटक केली.यांनी लोनच्या नावाखाली कोणाकोणाची फसवणूक केली आहे याची चौकशी सुरु असून यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल असण्याची शक्यता असल्याचे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.


 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image