सारस्वत बँकेतर्फे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान


नवी मुंबई - देशाच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेतर्फे महाराष्ट्रातील कोविड-१९ विषाणूच्या प्रदुर्भावाने ग्रस्त असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीकरिता तसेच या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. 
                         कोविड-१९ या वैश्विक महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे व या आजाराची भीषणता सर्वत्र जाणवत आहे. अनेक उद्योगधंदे, जनतेच्या नोकऱ्या ऐरणीवर आल्या आहेत. कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने मृत व्यक्तींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारे आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेकरिता दिवसरात्र झटत आहेत. या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन, विविध उपाययोजना राबवून परिस्थिती सुधारण्याचे शर्थीचे प्रयत्न शासनातर्फे करण्यात येत आहेत.सारस्वत बँक ही महाराष्ट्राची हक्काची बँक आहे. बँकेने यापूर्वीही अनेक बिकट परिस्थितीत सर्वोतोपरी योगदान दिले आहे. २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बँकेत नोकरी देऊन बँकेने आधार दिला होता. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करून त्यांचे विस्कळीत जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये एक कोटींची देणगी देऊन हातभार लावला होता. समाजाप्रती असलेले आपले ऋण वेळोवेळी आपल्याला फेडावे लागते, याचे भान सारस्वत बँकेने नेहमीच ठेवले आहे. आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासणाऱ्या सारस्वत बँकेने  महाराष्ट्रातील जनतेच्या प्रति आपली निष्ठा कायम राखत जागतिक महामारी कोविड-१९ च्या भीषण संकटावर मात करण्यासाठी मदतीचा हात पुन्हा एकदा पुढे केलेला आहे.त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, जेष्ठ संचालक किशोर रांगणेकर, कार्यकारी संचालिका  स्मिता संधाने व मुख्य  महाव्यवस्थापक अजय कुमार जैन यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' करिता रुपये एक कोटींचा धनादेश त्यांना सुपूर्द केला.


Popular posts
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image