केंद्र सरकारच्या विविध धोरणाविरोधात युवक काँगेसचा कोकण भवन वर मोर्चा

नवी मुंबई : केंद्र शासन विविध धोरणे राबवत आहे.पण या मुळे वाढत असलेली बेरोजगारी व बंद पडत असलेले छोटे मोठे उद्योग धंदे.याचा सर्वसामान्य जनजीवणावर विपरीत परिणाम होत आहे.म्हणून मंगळवारी सकाळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी  मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने कोकण भवन वर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याचे नेतृत्व नवी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुबिन थॉमस यांनी केले.
                 युवक काँग्रेसने काढलेल्या मोर्चा मध्ये त्यांच्या मागण्या मध्ये मोदी सरकारने दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन पाळले नाही. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु मध्यम उधोगाला मोठा फटका बसने, त्यातच वस्तू सेवा कर मुळे लघु माध्यम उधोगाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यानंतर लॉक डाऊन मुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार होणे हे सर्व केंद्र सरकारच्या लहरीपणामुळे झाले आहे. त्यातच देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळे नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. अर्थव्यवस्था ढासळलेल्या मुळे जेडीपी दर एप्रिल व जून या तीन महिन्यात शून्यखाली घसरून 23.9 टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे असे मोर्च्या मध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुबिन थॉमस यांनी सांगितले.केंद्र सरकार राज्यांना विश्वासात न घेता अडमुठे धोरण राबवून नीट, जेईई परीक्षेचा निर्णय असो वा राज्यांना जीएसटी मधील वाटा. यामुळे राज्याची अवस्था गंभीर होत चालली आहे. खरतर सध्याच्या परिस्थितीत राज्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. परंतु असे करताना दिसत नाही. केंद्र शासनाच्या या वागणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. तर बिगर भाजप सरकार असणाऱ्या राज्यांनाही कारभार करणे मुश्किल झाले आहे. सरकारी आस्थापणानंचे खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा केंद्र सरकार राबवत असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला.मोर्च्याची सुरुवात आग्रोली येथील तलावापासून करण्यात आली. तसेच कोकण भवन येथे मोर्च्याचे समारोप करण्यात आले. युवक काँग्रेसचे निवेदन कोकण भवनाचे उपायुक्त मनोज कानडे यांनी स्वीकारले. यावेळी सहसचिव रिशिका रका, युवक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रिज किशोर दत्त,सरचिटणीस अभिजित शिवरकर, सरचिटणीस कॅरिना झेवीयर, प्रवक्ते आनंद सिंग बंटी, प्रदेश काँग्रेस सचिव संतोष शेट्टी, प्रदेश काँग्रेस सचिव रामचंद्र दळवी, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष- अनिल कौशिक, नवी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा- उज्वला साळवे व काँग्रेसचे नवी मुंबई प्रतिनिधी सुधीर पाटील,अजय डोमाकोंडा, आफ्रिदी शेख, सर्वेश दुबे, निझाम अली शेख, सींतीया जी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 


Popular posts
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image