अरविंदो मिरा संस्थेतर्फे विविध शिक्षकांच्या कार्याचा सन्मान 


अरविंदो मिरा संस्थेतर्फे विविध शिक्षकांच्या कार्याचा सन्मान 


नवी मुंबई - शिक्षक दिनाचे औचित्य साधून अरविंदो मिरा संस्थतर्फे शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमाचेे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून शाळा,महाविद्यालय बंद असतांनाही शिक्षकांनी कशाचीही तमा न बाळगता आपली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली.त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे अरविंदोे मिरा संस्थेच्या अध्यक्षा नयन पवार यांनी सांगितले.
                     पाच सप्टेंबर हा 'शिक्षक दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा 'शिक्षक दिन' या वर्षी सोेशल डिस्टनसिंगमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थित साजरा करणे शक्य झाले नाही. सर्व शाळा, महाविद्यालय बंद जरी असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीतच आहेत. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा या हेतूने अरविंदोे मिरा संस्थेच्या अध्यक्षा नयन पवार यांनी रॉयल इंग्लिश स्कूल, नवीन पनवेल येथे सर्व शिक्षकांसमवेत 'शिक्षक दिन' साजरा केला.यावेळी अभिनेत्री नयन पवार यांनी शिक्षकांना भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोरोना काळातील त्यांच्या कार्याचा गौैरव करताना त्या म्हणाल्या, शिक्षक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करीत असतात. त्यांच्यात व्यक्तिमत्व विकास घडवून त्यांना देशाचे चांगले नागरिक बनविण्यावर त्यांचा भर असतो. शिक्षक हे निर्विवादपणेे देशाचे आधारस्तंभ आहेत. समाजाला योग्य दिशा दाखविणारा शिक्षक असतो. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार वाढली आहे. सध्या शिक्षणाचे अवमूल्यन देखील होत आहे. आज शिक्षकांसमोरही कठीण आव्हाने उभी आहेत. असे असले तरीही आजच्या डिजिटल युगातही शिक्षक निरनिराळे विषय शिकवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करीत असतात. त्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थ्याने गुरू-शिष्य संबंधातील पवित्र भावना ज्वलंत ठेवली पाहिजे. असे उद्‍गार शिक्षकांचा सन्मान करताना अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा नयन पवार यांनी काढले. रॉयन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका यावेळी म्हणाल्या की, खरोखर शिक्षक खूप मेहनत घेतात, त्यांचा सन्मान होणे काळाची गरज आहे. भविष्यातही शिक्षकांच्या उपक्रमाला सहकार्य करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली व अरविंदो मिरा संस्थेचे आभार मानले.याप्रसंगी अभिनेत्री नयन पवार,शीतल सातपुते तसेच रॉयल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका नाझनीन पालेकर, शिक्षिका माधुरी जाधव, वर्षा शिर्के, प्रिती नाईक,निशा प्रभू, मृणाली कांगणे, रिचा काटकर, प्रणिता सोळंके, रेश्मा जाधव, खलिदा जमादार, राकेश कोपर्डे, दर्शना तावडे, खुशबू वर्मा, देवश्री कोळवणकर, रूपाली भालेराव, जैबा सैफ पठाण, तनुश्री तुषार म्हात्रे, नेेहा अभिजीत अभ्यंकर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी सर्व शिक्षकांना सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले.तसेच शाळेतील इतर कर्मचारी शिपाई सुरक्षा रक्षक यांचेही आभार मानण्यात आले.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image