लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध-   अनिल महाजन 

नवी मुंबई - विधिमंडळ सभागृहात पत्रकाराला अपशब्द वापरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला अनेक पत्रकार बांधवांचा केला अपमान पत्रकाराचा चा आवाज दाबण्याचा राज्यसरकार चा प्रयत्न पत्रकार अर्णब गोस्वामी असो किंवा राज्यातील कुठला ही पत्रकार असो त्यांचा आवाज दाबण्याचा कोणीही प्रयत्न करू नये वेब मीडिया असोसिएन त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहणार असा इशारा वेब मीडिया असोशिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी दिला आहे.
                  राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. विधिंडळ सभागृहात या प्रस्तावावर बोलत असताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविषयी अपशब्द वापरले, असे सांगत वेब मीडिया असोशिएशनने याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राज्यातील कोणत्याही पत्रकाराबाबत असे शब्द वापरणे म्हणजे सर्व पत्रकार बांधवांचा हा अपमान आहे. हा अपमान खवपून घेतला जाणार नाही,असेही वेब मीडिया असोशिएशनने ठणकाऊन सांगितले.रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना परीवहन मंत्री अनिल परब यांनी गोस्वामी यांच्याबद्दल सुपारी घेऊन काम करणारा पत्रकार. टीनपाट पत्रकार असे शब्द वापरले. हे शब्द म्हणजे राज्यातील पत्रकार बांधवांचाच अपमान आहे. प्रसारमाध्यमांनी सरकार विरोधात बोलू नये. सरकारचा हालगर्जीबणा ध्यानात आणून देऊ नये, असाच सरकारचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही वेब मीडिया असोसिएशनने केला आहे.दरम्यान, एखादा पत्रकार चुकला असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई जरुर करण्यात यावी. पण राज्याच्या एखाद्या जबाबदार मंत्र्याने विधानसभेच्या सभागृह मध्ये असभ्य भाषा वापरणे कितपत योग्य आहे?, असा सवालही असोशिएशनने उपस्थित केला आहे.दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत वेब मीडिया असोसिएशनने म्हटले की, हेच पत्रकार बांधव तुम्हाला दिवसभर दाखवत असतात. आता पत्रकारांबाबत अपशब्द काढले जातात तर त्यावेळी संजय राऊत कोठे गेले असा सवालही विचारला आहे. दरम्यान, वेब मीडिया अर्णब गोस्वामी पाठीशी ठामपणे उभा आहे असे सांगतानाच पत्रकारांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांना जनाताच धडा शिकवेल, असे वेब मीडिया असोसिएशनने म्हटले आहे.


Popular posts
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image