विविध देशातून मुंबईत आले १ लाख १७ हजार ४३३ नागरिक, ३१ ऑक्टोबर पर्यंत आणखी २०९ विमानांनी येणार प्रवासी

विविध देशातून मुंबईत आले १ लाख १७ हजार ४३३ नागरिक, ३१ ऑक्टोबर पर्यंत आणखी २०९ विमानांनी येणार प्रवासी


मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर कालपर्यंत १०४५ विमानांनी १ लाख १७ हजार ४३३ प्रवासी दाखल झाले असून हे प्रवासी विविध  देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याचे व त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम महाराष्ट्र शासनामार्फत यशस्वीरित्या पार पाडण्यात येत आहे. अभियानांतर्गत ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी २०९ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ३८ हजार ६०२, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ३७ हजार २०१ आणि इतर राज्यांमधील प्रवाशांची संख्या ४१ हजार ६३० इतकी आहे.
               मुंबई विमानतळावर आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले असून यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग,  कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड,सौदी अरेबिया, कॅनडा, पुर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया, कामेरून, युनायटेड अरब अमिराती, कांगो, सिरा लिओन, लिओन, इथोपिया या देशांचा समावेश आहे.बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. त्यांना तेथील जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत कॉरंटाईन करण्याची व्यवस्था केली जात आहे.महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाच्या 24 मे 2020 रोजीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना उतरवून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतुक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून संबंधित राज्यांकडून त्यांचे पासेस येताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.वंदेभारत अभियानातील कामकाज हे जिल्हाधिकारी कार्यालय, उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ यांच्या समन्वयातून केले जात आहे.
          


Popular posts
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
आईने दिले आपल्या १४ वर्षांच्या मुलाला जीवनदान, मूत्रपिंड दान करुन एका मातेने तीव्र मूत्रपिंडाच्या आजारातून वाचवलं आपल्या चिमुकल्याला
Image