महाराष्ट्र भवन नवी मुंबईत होणार, मनसे नवी मुंबईकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

नवी मुंबई - वाशी येथे दोन एकरच्या भूखंडावर महाराष्ट्र भवन व्हावे यासाठी मनसेने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन होणार ही घोषणा केली.त्याबद्दल मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी वाशी येथील भूखंडा जवळ जमून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
               गेली १५ वर्ष हा भूखंड वाशी येथे महाराष्ट्र भवन साठी आरक्षित आहे.या वाशी परिसरात केरळ,उत्तर प्रदेश,बिहार,अरुणाचल प्रदेश या राज्यांची भवने मोठ्या प्रमाणात उभी असताना महाराष्ट्र भवनच का उभे राहत नाही असा सवाल करत मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवन झाले पाहिजेल असा फलक लावला तर प्रतिकारत्मरीत्या हाती कुदळ फावडे घेऊन महाराष्ट्र भवनचे भुमीपूजन केले होते व सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणीच्या दालनात ही आंदोलन केले होते.सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारला याची दखल घ्यावी लागली आणि ही घोषणा करावी लागली असे मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट,कोकण,खानदेश या ग्रामीण भागातून पोलिस भरती,रेल्वे भरती,विविध स्पर्धा परीक्षा ,नोकरीच्या मुलाखती यासाठी येणार्‍या तरुण तरुणींची या महाराष्ट्र भवनात राहण्याची सोय होईल अशी अपेक्षाही गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे.तर सुसज्ज व सुंदर वास्तु उभी राहावी अशी आशा मनसेने व्यक्त केली आहे.महाराष्ट्र भवन उभे राहत नाही तो पर्यंत मनसे नवी मुंबई याचा सतत पाठपुरावा करेल असे ही गजानन काळे यांनी म्हटले आहे त्यामुळे ही फक्त निवडणुकी पुरती  घोषणा ठरू नये अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने याचे उत्तर देईल असा इशारा सरकारला दिला आहे.


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image