चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,दोघांवर गुन्हा दाखल ,एकाला अटक

नवी मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचार प्रकरणाने देश हादरला असता त्याचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटले आहेत.या प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच नवी मुंबई शहरातही एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणाने शहरात खळबळ माजली असून पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. आब्बास शेख (२५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून त्याची पत्नी पाली शेख हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आब्बास शेख हा पत्नी व सहा वर्षाच्या मुलासह नेरुळ गावात राहणार असून त्याच्या घराच्याच बाजूला पीडित मुलगी राहत होती.
                 आब्बासचा सहा वर्षाचा मुलगा असून त्याचा सांभाळ व्हावा यासाठी त्याने पीडित मुलीला घरी सांभाळण्यासाठी आणले होते.त्याचदरम्यान त्याने त्या चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना काही घडली आहे.या प्रकरणी दोघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे.पत्नी गावी गेल्याचा फायदा घेऊन नराधमाने तब्बल १० दिवस बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.यावेळी नराधमाने पीडित मुलीला सदरील प्रकार आई वडिलांना सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली होती.कालांतराने तिचे पोट दुखू लागल्याने सदरील प्रकार उघडकीस आला आहे.फेब्रुवारी महिन्यात आब्बास शेख व त्याच्या पत्नीने पीडित मुलीच्या आईला भेटून मुलगा सांभाळण्यासाठी तुमच्या मुलीला पाठवा असे सांगितले.पीडित मुलीचे आई वडील दोघेही दिवसभर कामानिमित्त बाहेर राहत असल्याने त्यांनीही मुलीला मुलगा सांभाळण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर पाली शेख गावी गेली असता त्याचा फायदा या नराधमाने घेतला.पत्नी घरी नसल्याने आब्बास शेख याने त्यांचा मुलगा सांभाळण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवरच हात टाकला.सदरील प्रकार आईवडिलांना सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी देत त्या नराधमाने अनेक दिवस त्या अल्पवयीन मुलीवर बलत्कार केला.काही दिवसांनी पीडित मुलीचे पोट दुखू लागले असता तिने सदरील बाब तिच्या पालकांना सांगितली.त्यावेळी ती गर्भवती असल्याची बाब मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आली असता त्यांनी याचा जाब आब्बास शेख व तिच्या पत्नीला विचारला.त्यावेळी पाली शेख हिने पतीकडून झालेली चूक मान्य करत पीडित मुलीला शिरवणे गावातील एका खासगी डॉक्टरकडे नेले.व त्या डॉक्टर कडून दोन इंजेक्शन व दोन गोळ्या खाण्यास असा उपचार करून घेतला.या उपचारानंतरही पीडित मुलीचा गर्भ वाढतच गेला.त्यावर पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी आब्बास शेख याला अटक केली.या प्रकरणात त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल असून अदयाप तिला अटक करण्यात आलेली नाही.तर आब्बास ची पत्नी पाली शेख ही पीडित मुलीला बलात्कार प्रकरणानंतर उपचारासाठी कोणत्या डॉक्टर कडे घेऊन गेली होती,का गेली होती.असा प्रश्न उपस्थित झाला असून त्या तो कोण डॉक्टर आहे,नेमका कोणता उपचार त्या पीडित मुलीवर करण्यात आला,इंजेक्शन व गोळ्या नेमक्या कशासाठी देण्यात आल्या यासह अनेक तर्क वितर्काना उधाण आले आहे.पीडित मुलगी ही झोपडपट्टीत राहणारी असून भविष्यात मुलीबरोबर दगाफटका होण्याची शक्यता असल्याची भीती मुलीच्या पालकांनी व्यक्त केली आहे.
कोट - या प्रकरणात दोघांना अटक केली आहे कि नाही हे सांगता येणार नाही,आय ओ ला विचारावे लागेल,एकाला अटक आहे वाटतं,दुसऱ्याला नाही.तरी तुम्ही आय व शी बोलून घ्या मला काही कल्पना नाही.
राजेंद्र चव्हाण - वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,नेरुळ पोलीस ठाणे


Popular posts
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image