नवी मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून मनसेत सुरु असलेला प्रवेशाचा धडाका आजही सुरूच आहे.दादर कृष्णकुंज येथे नवी मुंबईतील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण, महिला यांनी हजारोच्या संख्येने मनसेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे नवी मुंबई उपजिल्हाध्यक्ष जगन्नाथ दाते, आम आदमी पक्षाचे नवी मुंबई समन्वयक अमित सेठ, जगदंबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे बांद्रा जिल्हा उपाध्यक्ष रोहित गोळे, यशोदा किशोर ईशी राष्ट्रवादी काँग्रेस सानपाडा वॉर्ड अध्यक्ष,नवी मुंबई काँग्रेस जिल्हा सचिव मनोज पाटील, नेरुळ मधील काँग्रेस चे वॉर्ड अध्यक्ष नंदू भाऊ गायकवाड, नेरुळ राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष वंदना गाडगे, नवी मुंबई श्री २०१८ इब्राहिम बेग, दिवाळे गावातील प्रसिद्ध उद्योजक शाम कोळी, सीवूड्स मधील नरेश कुंभार, आकाश खिलारी, पालिका कामगार आणि वाहतूकदारांनी यांच्यासह हजारो कार्यकर्ते हजर होते.
त्याचप्रमाणे २०१८-१९ मधील सिडको सदनिका सोडत धारकांचे मुद्रांक शुल्क मनसेच्या प्रयत्नामुळे लाखो रुपयांवरून केवळ रुपये एक हजार करण्यात आले. तसेच कोरोना काळात आर्थिक संकटामुळे हप्ते न भरलेल्या १७२० सोडतधारकांचे घर रद्द झाले होते. त्यांना घर घेण्याची पुन्हा एकदा संधी सिडकोने मनसेच्या प्रयत्नामुळे दिली. या सोड्तधारकांनी राज ठाकरे याना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. तसेच राज ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांमुळे कृष्णकुंज बाहेरील वातावरण जल्लोषपूर्ण झाले होते. कार्यकर्त्यांनी राजसाहेब ठाकरेंचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणांनी कृष्णकुंज परिसर दणाणून सोडला. त्याचप्रमाणे सिडको सोडत धारक मोठ्या संख्येने कृष्णकुंज बाहेर आभार व्यक्त करणारे फलक घेऊन उभे होते. महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह बघून राज ठाकरेंनी डिसेंबर महिन्यात कोरोनाची परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ अशी घोषणा केली. त्यामुळे नवी मुंबईतील तमाम महाराष्ट्र सैनिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
नवी मुंबईतून विविध पक्षातील तरुण-महिलांचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश