स्मार्ट व्हिजन प्रॉडक्ट प्रा.ली कंपनीच्या नऊ संचालकांना अटक 

नवी मुंबई - काही कालावधीत गुंतवलेल्या रकमेच्या मोबदल्यात जास्त पटीने मोबदला देण्याचे आश्वासन देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या स्मार्ट व्हिजन प्रॉडक्ट प्रा.ली कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                    आनंद रामचंद्र टोळे ,प्रदीप छोटेलाल मोर्या ,भूपेंद्र अशोककुमार मेराडा ,विनायक तुकाराम मोरे ,सतीश गुरुलिंगपा माजी ,रवीकुमार घेराडे ,आनंद लक्ष्मण सकपाळ ,अनिल शिवाजी भोईर व मिल्केराम उखाराम प्रजापती अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.हे सर्व कंपनीचे संचालक असून त्यांच्याबरोबर इतर संचालकांचीही चौकशी सुरु आहे.या सर्वानी स्मार्ट व्हिजन प्रॉडक्ट प्रा.ली कंपनीमार्फत मनी सर्क्युलेशन पद्दतीने लाखो गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आणि ती कंपनी बंद करून रिचहूड क्लब नावाची विनापरवाना नवीन कंपनी स्थापन केली.त्या नंतर त्या कंपनीमार्फत १५ नोव्हेंबर रोजी रॉयल ऑर्चिड या हॉटेलमध्ये लोकांकडुन नव्या स्वरूपात गुंतवणूक करण्यात यावी यासाठी सेमिनार ठेवला.या सेमिनारची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेला मिळाली असता या माहितीच्या आधारे पोलिसानी सेमिनावर छापा टाकला व वरील सर्वाना अटक केली.याचवेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी नागरिकांना आव्हान करत सांगितले की कोणतीही संस्था अगर व्यक्ती अशा पद्धतीने काही कालावधीमध्ये दामदुप्पट ,मनी सर्क्यूलेशन करून मोबदला देण्याबाबत आमिष दाखवत असतील तर अशा आमिषास फसवणूक स्वरूपात बळी न पडता त्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेस द्या.त्याचबरोबर स्मार्ट व्हिजन प्रॉडक्ट प्रा.ली व रिचहूड क्लब या कंपनीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे अथवा ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा.



Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू