घणसोलीतील पाच मजली इमारतीला भीषण आग


 घणसोलीतील पाच मजली इमारतीला भीषण आग

नवी मुंबई : घणसोली गावातील बेकरी मागे असलेल्या अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली.या आगीत इमारतीत तळमजल्यावर पार्किंगध्ये उभ्या असलेल्या १० ते १२ मोटर सायकल जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा संशय काही रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

              या इमारतीच्या शेजाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात आली असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलानं स्पष्ट केलं.बुधवारी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी या इमारतीच्या तळमजल्यावर मोटारसायकल पार्किंगच्या ठिकाणी अचानक आग लागली. या आगीची झळ पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या फ्लॅटपर्यंत पोहोचली. त्याच्या फ्लॅटने पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावर आगीचे तांडव पाहायला मिळाले. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत या आगीची झळ पोहोचली. दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अग्नितांडव निर्माण झाल्याने साखर झोपेत असणारे फ्लॅटमधील रहिवाशी खडबडून जागे झाले आणि त्यांची एकच धावपळ उडाली.त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आणि शेजाऱ्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इमारतीत राहणाऱ्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image