वाढीव वीज बिलाच्या विरोधात प्रदीप बी.वाघमारे यांचा प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा

नवी मुंबई - सध्या लॉकडाउनचा काळ सुरू असल्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक दृष्ट्या त्रस्त झाला आहे.लॉक डाउनमुळे अनेकांची दिवाळी आर्थिक अडचणी मुळे साधेपणानेच गेली आहे. त्यातच वीज महावितरण कंपनी कडून गाव गावठाण आणि झोपडपट्टी विभागातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा हजारो रुपये रकमेची बिले पाठवण्यात आली आहेत. ही बिले न वापरलेल्या विजेची असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.अशात वीज बिल भरलेच पाहिजे असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितल्यामुळे सामान्य वीज ग्राहक चिंतेत पडला आहे. म्हणून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष ,कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांनी शिष्टमंडळासह वीज महावितरणचे कार्यकारी अभियंते बोरसे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

                              त्या निवेदनात वीज ग्राहकांना वीज बिलात ५० % सवलत देण्यात यावी,ग्राहकांचे प्रत्यक्ष वीज मीटर ची तपासणी करून प्रत्यक्ष रिडींग घेऊन ग्राहकांना योग्य रकमेचे वीज बिल बनवून द्यावे, वीज बिलात लावण्यात येणार अवांतर इतर चार्जेस कायमचे कमी करण्यात यावेत, झोपडपट्टी भागात नवीन नवीन कनेक्शनसाठी आकारण्यात येणारी अनामत रक्कम कमी करण्यात यावी, नागरिकांच्या आर्थिक  परिस्थितीचा विचार करून  बिल भरण्याच्या कारणास्थव कोणत्याही ग्राहकांची वीज कापण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या असून पुढील महिन्यातील मंगळवार दिनांक ८ डिसेंम्बर २०२० पर्यंत निवेदनाचा विचार करून मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा ८ डिसेंम्बर २०२० रोजी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष कामगार नेते प्रदीप बी.वाघमारे यांनी प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जो पर्यंत सामान्य नागरिकांना वीज बिलात सवलत मिळत नाही आणि निवेदनातीळ पूर्ण मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे प्रदीप बी.वाघमारे यांनी  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जाहीर केले आहे.निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळात संस्थेचे पदाधिकारी नरेंद्र जाधव, जायदा बेगम,प्रकाश राठोड,विकि साळवे,संतोष तायवाडे, शशी बाबू इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महा वितरणाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे आणि वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब यांना देण्यात आले आहे.

Popular posts
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image