सानपाडा येथे गळफास घेऊन सुरक्षा राक्षकाची आत्महत्या


बेलापूर वार्ताहर - सानपाडा मधील रसोई बार अँन्ड रेस्टॉरंट मध्ये रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या व्यक्तीने शनिवारी पहाटे बार जवळील शेड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून सानपाडा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी घटनेची नोंद सानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

                 नारायण नंदा खत्री (42) असे आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.हा सानपाडा मधील रसोई बार अँन्ड रेस्टॉरंट मध्ये रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. मूळचा नेपाळ मध्ये राहणारा खत्री या ठिकाणी एकटाच राहत होता. ज्या ठिकाणी काम करायचा त्याच ठिकाणी तो राहतही होता.गेल्या अनेक दिवसांपासून तो त्रस्त असल्याने मानसिक तणावात होता. लॉकडाऊन नंतर बार चालू होताच तो कामावर पुन्हा सक्रिय झाला. मात्र त्यावेळी तो व्यवसनाच्या आहारी गेला होता. त्यातच तो अधिकच मानसिक तणावात गेल्याने त्याने अखेर शनिवारी पहाटे रसोई बार अँन्ड रेस्टॉरंट असलेल्या शेड मध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर बाब सकाळी 8 च्या सुमारास पोलिसांना समजली असता पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी जाऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रवाना केला.शवविच्छेदनाचा अहवाल येताच आत्महत्येचे मुख्य कारण कळू शकणार आहे असे सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.
Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image