खैरणे-बोनकोडे रेल्वे स्थानकाचे काम सुरु होणार, दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळणार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे लोकनेते गणेश नाईक यांना आश्‍वासन



खैरणे-बोनकोडे रेल्वे स्थानकाचे काम सुरु होणार, दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळणार

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे लोकनेते गणेश नाईक यांना आश्‍वासन

नवी मुंबई - रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील ब्रिटीशकालिन मोगली धरण लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे.आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे सोमवार 23 नोव्हेंबर रोजी भेट घेतली आणि नवी मुंबईतील रेल्वे विषयक महत्त्वाच्या मागण्या आणि समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीस ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

                डॉ. नाईक यांनी त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात मोगली धरण महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर नवी मुंबईतील वाढते नागरीकरण आणि प्रवाशांची संख्या पाहता दिघा आणि खैरणे-बोनकोडे ही दोन रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करुन घेतली होती.आ. गणेश नाईक यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरबे धरण विकत घेण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नवी मुंबई शहर स्वयंपूर्ण झाले आहे. मोगली धरण महानगरपालिकडे हस्तांतरीत करुन घेतल्यास अतिरिक्त पाण्याचा एक स्त्रोत महापालिकेकडे तयार होणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी पर्यटनस्थळ देखील विकसित करता येईल, अशी भूमिका लोकनेते आ. नाईक यांनी रेल्वेमंत्र्याच्या बरोबरच्या बैठकीत मांडली. 31 ऑगस्ट 2018 रोजी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे तत्कालिन आमदार संदीप नाईक यांनी देखील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे दिर्घकालिन भाडेपट्ट्यावर हस्तांतरण करावे अशी मागणी केली

...


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image