ग्रीन होपच्या वतीने स्वच्छता व वृक्षारोपण अभियान


नवी मुंबई - गत वर्षी भारत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कायम राखत देशात तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई शहराने झेप घेतली. या वर्षी या सर्वेक्षणात प्रथम क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईकर आणि येथील विधायक संस्थांनी कंबर कसली असून नवी मुंबईच्या हिरवाईत भर घालणाऱ्या ग्रीन होप संस्थेतर्फे मंगळवार 1 डिसेंबर पासून भारत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

                   शहराचा विकास होत असताना येथील पर्यावरणाचे देखील रक्षण झाले पाहिजे या धोरणाचे पुरस्कारकर्ते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात सकाळी 10 वाजता होणार आहे. माजी खासदार डाॅ. संजीव नाईक, ग्रीन होप संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सी.डी.पगारे, संदीप तिवारी, निरज झा या मान्यवरांसह लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कोरोना विषयक खबरदारी पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे.1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत हि मोहिम हाती घेण्यात आली आहे.ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, जुईनगर, नेरूळ, सीवूड-दारावे, सीबीडी-बेलापूर अशा नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान हाती घेवून या परिसरात उपयुक्त व जगतील अशा झाडांची रोपे लावण्यात येणार आहेत.आ.नाईक संस्थापित ग्रीन होप ही निसर्गसंवर्धन करणारी स्वयंसेवी संस्था असून या संस्थेने वृक्षारोपण मोहिमा, मोफत वृक्षरोपांचे वाटप, खारफुटी रोपण, विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांमधून निसर्गरक्षणाची जाणिव दृढ करणे इत्यादी उपक्रम आतापर्यत यशस्वीपणे राबविले आहेत.

Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image