निराधारांची दिवाळी चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन समवेत साजरी.

नवी मुंबई - बाल दिन व दिवाळी एकच तारखेला यावर्षी साजरे होत आहे. हेच औचित्य साधत चाईल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने निराधार व गरजवंत मुलांची दिवाळी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गोड करण्यात आली.गेली पाच वर्ष हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जी मुले खरोखरच निराधार आहेत अशा गरजवंत मुलांना शिक्षणाकरिता मदत केली जाते.या वर्षी याच अनुषंगाने दिवाळीचे औचित्य साधत घाटकोपर येथे शैक्षणिक साहित्याचे चे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपकबाबा हांडे, संतोष खरात, राजू घुगे, स्नेहा खुराडे, चंद्रमणी जाधव, चंद्रकांत कुंजीर व इतर मान्यवर उपस्थित होते.
                हा कार्यक्रम संस्थेचे सर्वेसर्वा विशाल गारगोटे यांच्या संकल्पना राबविण्यात येतो. ते याविषयी अधिक माहिती देताना सांगतात की " समाजात कित्येकांना मदतीची गरज असते त्यातच बालपण हे महत्त्वाचे आहे.योग्य वेळी योग्य मदत व दिशा मिळाली तर बालपणाला एक चांगले वळण लागू शकते. कित्येक मुलांना ते निराधार असल्याने योग्य मदत मिळत नाही व ते गुन्हेगारी कडे वळतात. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा समाजाचा एक घटक मानून त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे तर त्यांचे आयुष्य सुखकर केले पाहिजे. यातूनच समाजाचे व देशाचे हित साधल्या जाते."यावेळी मुलांना दप्तर, पुस्तके, कंपास पेटी, नोटबुक्स, एवढेच नव्हे तर खेळणी सुद्धा भेट म्हणून देण्यात आली. यामुळे दिवाळी मध्ये त्यांच्या ओठावर हास्य उमलले. ही संकल्पना ज्यांच यांनी अमलात आणली ते विशाल गारगोटे गेली दहा वर्ष सामाजिक क्षेत्रात आरोग्य , शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मोरया इंटरटेनमेंट ही संस्था स्थापन करून शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. याचाच भाग म्हणून पद्मश्री अनुप जलोटा, पद्मभूषण जाकीर हुसेन, पद्मभूषण अमजद अली, पद्मश्री शुभा मुग्दूल, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व महेश काळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सहायता निधी उपलब्ध केली आहे.

Popular posts
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image