आधुनिक काळातील श्रावण बाळांना पाहून नानासाहेब पटोलेही गहिवरले,तानाजी आणि बाळू या काळे बंधूनी वयोवृद्ध आईवडीलांना घडवली, शेकडोवेळा आळंदी पंढरपूर वारी. नानाभाऊंनी रस्त्यात गाडी थांबून देऊ केलेली मदत

मुंबई : वृध्द आईवडिलांचा त्रास नको म्हणून त्यांना आळंदीला सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सख्ख्या भावांचा अनुभव आळंदीकरांनी नुकताच अनुभवला. त्याच आळंदीत वयाची ५० शी पार केलेले दोघे सख्खे भाऊ कसलीही चिंता न करता वयोवृद्ध आईवडिलांना आळंदी ते पंढरपूर अशी वारी स्वतःला बैलगाडीला जोतून करत असल्याचे पाहून राज्य विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनाही गहिवरून आले. आधुनिक काळातील या दोघा श्रावण बाळांच्या आईवडीलाप्रति असलेल्या भक्तीला नानासाहेबांनी वंदन करत त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याचा शब्द दिला.                 

                विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले दोन दिवसांच्या पंढरपूर, आळंदी दौऱ्यावर होते. पंढरपूर येथील कार्यक्रम आटपून नानासाहेब टेम्भुर्णी मार्गे आळंदीला येत होते. वाटेत मध्येच  दोन माणसे बैलगाडीसदृश्य गाडी खेचत वृद्ध जोडप्याला घेऊन जात असलेले त्यांनी पाहिले. कुतुहुल म्हणून नानासाहेबांनी त्यांना थांबवले आणि चौकशी केल्यावर त्यांना या श्रावण बाळांची कथा समजली. ९० वर्षीय ज्ञानदेव कोंडीबा काळे आणि ७५ वर्षीय जनाबाई काळे हे आळंदीत रहाणारे वारकरी दांपत्य. शेतकरी असलेल्या या दांपत्याने उमेदीच्या काळात विठुरायाच्या प्रति असलेली आपली भक्ती जोपासली. वाढत्या वयानुसार पुढे काळे दांपत्याला प्रवासाचा त्रास होऊ लागला. वारीत खंड पडणार म्हणून आपल्या आईवडिलांची होणारी घालमेल पाहून त्यांना पंढरपूरची वारी नियमितपणे घडवून आणण्याचा वसा ५५ वर्षीय तानाजी आणि ५० वर्षी बाळू काळे यांनी उचलला आणि गेली काही वर्षांपासून त्यांनी कायमही ठेवला. आपले कुटूंब, व्यवसाय यापासून काही दिवस सुट्टी घेऊन मागील काही वर्षात या दोघा भावांनी तब्बल तीनशे हुन अधिक वेळा आई वडिलांना आळंदी ते पंढरपूर अशी वारी घडवून आणली. पैसा, इतर साधन सामुग्री असो की नसो ज्ञानेश्वर माऊली आणि विठुरायाच ही सेवा आमच्याकडून करवून घेत आहे त्यामुळे शेवटपर्यत त्यात खंड पडू देणार नाही असे या दोघा भावांनी सांगितले. त्यांच्या या भक्तीला पाहून नानासाहेब यांनी काळे बंधूंना पुढील प्रवासासाठी छोटी आर्थिक मदत देऊ केली. याशिवाय नानासाहेबांनी संपर्क साधण्यासाठी स्वतःचे दूरध्वनी क्रमांक देत त्यांना मदत करण्याचे वचन दिले. यावेळेस नानाभाऊ बरोबर पुण्याचे उद्योगपती अनिल झोडगे व कल्याणचे क्रीडासंघटक अविनाश ओंबासे होते.

Popular posts
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image