एन,एम.एम.टी. ची बहुउद्देशीय ' नवी स्मार्ट कार्ड योजना ' कार्यान्वित

नवी मुंबई - महानगरपालिका परिवहन उपक्रमाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, कॅशलेस पध्दतीचा अवलंब करण्यात येत असून, प्रवाशांसाठी मार्च 2020 पासून "नवी स्मार्ट कार्ड" योजना कार्यान्वित करण्यात आली होतीपरंतू कोविड 19 च्या प्रार्दुभावामुळे ही स्मार्ट कार्ड योजना तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. तथापि आता 01 डिसेंबर 2020 पासून स्मार्ट कार्ड योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून प्रवाशांना वाहतुकीसाठी सुलभ असे ' ओपन लूप नवी  स्मार्ट कार्ड ' उपलब्ध करून देणारी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम ही देशातील एकमेव सार्वजनिक परिवहन सेवा देणारी संस्था आहे.

                'नवी स्मार्ट कार्ड' धारकांस स्मार्ट कार्डचा वापर हा बस तिकीट व पाससाठी करता येईल. 'नवी स्मार्ट कार्ड' भारतात कोठेही चालेल. उदा: दुकानातील खरेदी तसेच ए.टी.एम. मधील व्यवहारासाठी सुध्दा याचा वापर करता येईल.सदरचे 'नवी स्मार्ट कार्ड' हे 'ए.टी.एम. कम डेबिट कार्ड' स्वरूपाचे असल्याने सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारासाठी ( देयक कर भरणा, सिनेमागृह, वाहतूक (बस, रेल्वे व विमान सेवा), मोबाईल रिचार्ज, डी.टी.एच. सेवा इत्यादींकरीता) सुलभपणे वापरता येईल. या 'नवी स्मार्ट कार्ड' मध्ये आपल्या वैयक्तिक रक्कमेच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी असून 'नवी स्मार्ट कार्ड' द्वारे होणाऱ्या सर्व व्यवहारांची माहिती संबंधितास 'एसएमएस  अलर्ट' द्वारे उपलब्ध होईल.सदर 'नवी स्मार्ट कार्ड' हे सध्या परिवहन उपक्रमाच्या सिबीडी बस टर्मिनसमधील पास वितरण कक्षात रू.100/- शुल्क आकारून प्रवाशांस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या बाबतच्या मागणीत वाढ झाल्यास इतर बस टर्मिनस व आगारामध्ये देखील हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या कार्डचा वापर हा वातानुकूलित बस मार्गावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला असून तो टप्प्याटप्प्याने सर्व बस मार्गावर कार्यान्वित करण्यात येणार आहे.


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image