डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त चैत्यभूमीच्या धर्तीवर तुर्भेत महामानवाचा देखावा


नवी मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त यंदा भीमसैनिकांना दादर येथील चैत्यभूमीवर जाता येत नसल्याने त्यांना त्याच धर्तीवर बाबासाहेबांना अभिवादन करता यावे म्हणून तुर्भे येथे डॉ.,बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा देखावा उभारून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी त्या ठिकाणी हजेरी लावली असता राजकीय पदाधिकाऱ्यांनीही डॉ.,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

                कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने यंदाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसैनिकांना येण्यास बंदी घालत घरातूनच आभिवादन करण्याचे आव्हान करण्यात आले होते.त्या आव्हानाला साद घालत शासनाचे नियम पाळून कार्यक्रम करण्यात आले.तुर्भे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांचे वास्तव्य असून त्यांच्यासाठी परिवहन सदस्य राजेंद्र पुनाजी इंगळे यांनी त्यांच्या कार्यालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या ठिकाणी त्यानी चैत्यभूमीच्या धर्तीवर देखावा उभारला असता अनेकांना त्या कार्यक्रमाची ओढ लागली आणि त्या ठिकाणी हजेरी लावत त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद बोधी नीकाळजे,संघटक सुभाष सभादींडे श्रामनेर, बौधाचार्य भारतीय बौद्ध महसभेचे संघटक दशरथ वाकडे म्हस्के,भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा शांता ताई रवी जाधव,समाज सेविका शीतल राहुल इंगळे, प्रमुख सल्लागार वंदनाताई गुप्ता प्रमुख सल्लागार वंदनाताई गुप्ता,वॉर्ड अध्यक्षा राजकुमारीचौहान,महामंत्री चंद्रभागा जाधव,सचिव कोमल राठोड,महिला सचिव बिन्दु मल्होत्रा,संगीता धोत्रे,महिला सचिव मीना जैस्वाल,मनीषा वाघमारे,सचिव सविता यादव,अख्तर भाई चौधरी,भारतीय बौद्ध महासभेचे संघटक सुभाष सभादींडे श्रामनेर, बौधाचार्य भारतीय बौद्ध महसभेचे संघटक दशरथ वाकडे म्हस्के,संतोष कांबळे,वाय. बी. कांबळे, भारतीय बौध्द महासभेचे वॉर्ड अध्यक्ष संतोष खंडागळे, तुर्भे वॉर्ड ६८ चे अध्यक्ष संतोष राठोड, वॉर्ड उपाध्यक्ष संदिप वाघमारे, महामंत्री ज्ञानेश्वर सरवदे, संघटक आरिफ चौधरी, युवा अध्यक्ष मयुरेश जाधव्,प्रमुख सल्लागार बंडू गायकवाड़, गणेश गोत्राल्ह,सरचिटनीसआदीत्य चंदन शिवे,सहसल्लागार गणेश राठोड,दयावान काळे,शैलेंद्र यादव तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई, बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image