तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?

तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ 

अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ?

कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?

नवी मुंबई :- तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अनधिकृत बांधकाम धारकांनी पुन्हा अनधिकृत बांधकामांचा धडाका लावला असून याच विभागात अतिक्रमण ही वाढले असल्याचे दिसून येत आहे.यावर नियंत्रण मिळण्याऐवजी अतिक्रमण कर्मचारी स्वतःची पोळी भाजून घेत असल्याची चर्चा या विभागात सुरु आहे.बेसमेंट मध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत असून त्या साठी अतिक्रमण कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सेटलमेंट होत असल्याचे दिसून येत आहे.एपीएमसी मार्केट मधील अनेक ठिकाणी इमारतीच्या बेसमेंट मध्ये अतिक्रमण झाले असून यावर अतिक्रमण कर्मचारी का गप्प आहेत असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

                 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट चे आदेश असतांनाही अनेक कर्मचारी त्याचे पालन करतांना दिसून येत नाही. दिखाऊ कारवाई करून इतर बांधकाम धारकांकडून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम सध्या अतिक्रमण कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे.तुर्भे गाव सेक्टर २१ मध्ये  A-1/37 घर नंबर २ व ३ या ठिकाणी सध्या स्थितीत अनधिकृत बांधकाम सुरु आहे.सेक्टर २२ प्लॉट नंबर ५१ वरही सध्या स्थितीत अनधिकृत बांधकाम सुरु आहे. एपीएमसी दाना मार्केट मधील G 19,G 1२ या दुकानावर अनधिकृत बांधकाम सुरु असून त्याकडेही अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.नुकताच अतिक्रमण विभागाचा पदभार डॉ कैलास गायकवाड यांनी स्वीकारला असून ते यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


Popular posts
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image