नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश


नवी मुंबई - शहरात उद्यानांची देखभाल आणि संवर्धन करण्यासाचा ठेका एन के शहा इंफ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराला देण्यात आला असून त्याच्या व्यवहारात करोडांचा भ्रष्टाचार असल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून जे अधिकारी या प्रकरणात सहभागी आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे २० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.त्या नंतर या मागणीचा आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करण्यात आला असता काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी या प्रकरणी १४ अधिकारी आणि कंत्राटदार याना नोटीस बजावली.त्यांचे उत्तर येताच सोमवारी मनपाच्या मनपा उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी या तिघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.तर कंत्राटदारालाही 15 दिवसात 8 कोटी 34 लाख रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.राजे प्रतिष्ठाणच्या मागणीला आयुक्तांनी दाद दिल्याने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत. 

             एन के शहा इंफ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराच्या माध्यमातून उद्यानात नियमबाह्य पद्धतीने खासगी सुरक्षा नेमण्यात आले आहेत.एका सुरक्षा रक्षकाला मनपाकडून प्रति २४,१४८/- रुपये देण्यात येतात.या प्रमाणे एकूण १२२ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत असे कंत्राटात नमूद करण्यात आले आहे.त्यावर कंत्राटदाराने नमो फैसिलिटी सर्व्हिसेस या कंपनीचे (नियमबाह्य पद्धतीने) सुरक्षा रक्षक नेमले आहेत.त्या सुरक्षा रक्षकांना कंत्राट मध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम वेतन स्वरूपात देणे गरजेचे असतांना त्यात तफावत असल्याचे आढळून आले आहे.यात एका सुरक्षा रक्षकाला ८ हजार ते ९ हजार रुपये देण्यात येत आहे.बाकी रक्कम कुठे जाते याची आपणाकडून चौकशी होणे गरजेचे आहे.मे महिन्यापासून बहुतांश उद्यानात सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून या रक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनात प्रति महिना १८ लाख रुपयांहून अधिक तफावत आहे.हा सर्व प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला असता यावर संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते.त्याचवेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेण्यात आली होती.त्यावेळी या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते.त्यानुसार कारवाई झाल्याने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.


कोट - उद्यान घोटाळा हा अगदी पारदर्शक असतानाही तब्बल ८ कोटींचे बिल अदा करण्यात आलेया प्रकरणाची माहिती उपायुक्त महाले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना असतांनाही त्यात वेळकाढू धोरण राबवण्यात आले.त्यामुळे या प्रकरणी अजून सखोल चौकशी करून काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे


योगेश महाजन - राजे प्रतिष्ठाण कामगार सेना (ठाणे जिल्हा अध्यक्ष)

Popular posts
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image