नवी मुंबई करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी कधी थांबणार? "आप" चा सवाल

नवी मुंबई - कोपरखैरणे ज्ञानविकास रोड सेक्टर १७ गहलोत कॉलेज जवळील रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु आहे, मुळात हा रस्ता चांगल्या पद्धतीचा असतांना देखील या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे आणि हे पाहून नागरिक डोक्याला हात मारताना दिसत आहे. ऐरोली, तुर्भे,घणसोली,रबाळे या सारख्या भागामध्ये नागरिक सुविधांचा दुष्काळ पडला असताना आपल्याच महापालिकेच्या काही भागात मात्र सुस्थितीत असणारे रस्त्याचे डांबरीकरण, सोसायट्यांचे भिंतीचे रंगीकरण करून सामान्य कर दात्यांचे पैश्यांची उधळ पट्टी स्वछता अभियाना मार्फत राबवतांना दिसतेय. श्रीमंत असणाऱ्या महापालिकेने  करदात्यांना लॉकडावून काळातील सवलत म्हणून पाणी आणि प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यास पुढाकार घेतला नाही पण अश्या प्रकारे होणाऱ्या पैसाची नासाडी हा खरंच श्रीमंत असणाऱ्या महापालिकेच्या आर्थिक नियोजनांवर गंभीर प्रश्न आहे. 

                       नवी मुंबईत सध्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु झालेय म्हणजेच निवडणुका आल्यात अशी समाजभावना रुजली आहे, एकी कडे घणसोली, ऐरोली,तुर्भे आणि इतर भागात, गटारी, ड्रेनेज आणि पाणी चे योग्य व्यवस्थापन नसताना चांगले रस्ते खोदून परत बनवणे हे वर्षानुवर्षे नवी मुंबईत दिसणारे चित्र आहे. सामान्य करदात्यांचा पैसे हा योग्य नियोजनाने समस्त नवी मुंबई भल्यासाठी वापरला गेला पाहिजे. डार्क लाईट स्पॉट ,CCTV, मूलभूत सुविधा या कमी उत्पन्न असणाऱ्या भाग मध्ये पण झाल्या पाहिजेत आणि मगच संपूर्ण नवी मुंबई चा विकास होतोय असं अभिमानाने सांगता येईल.  रस्त्यांचे डागडुजी करायला विरोध नाही पण सुस्थित असणारे रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण का असा सवाल आप ने केला आहे. कुठल्या ना कुठल्या कामासाठी सुस्थितीत असणारे रस्ते सातत्याने खोदले जातात आणि नाहक पैसाची नासाडी आणि सामान्य जनतेस होणारा नाहक त्रास आम आदमी पक्ष होऊ देणार नाही असं स्पष्ट शब्दात आप ने म्हटले  आहे


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image