नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्या - मनसे

नवी मुंबई - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. मुळात पालकमंत्री म्हणून अशी मागणी करताना नवी मुंबईकरांचा कानोसा घेणे आवश्यक होते, तो त्यांनी घेतला नाही याबद्दल खेद वाटतो. तरी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी ठाम भूमिका मनसे शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी घेतली आहे.

               मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई करांमधून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. नवी मुंबईतील जमिनी जेव्हा जे एन पी टी, सिडको १९८० च्या दरम्यान ताब्यात घेत घेऊन शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना अत्यंत एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला दिला जात होता. स्व. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा लढा उभारण्यात आला.१९८४ च्या प्रसिद्ध उरण परिसरातील आंदोलनात ५ जण शहिद झाले. आंदोलनाची तीव्रता बघून सरकारने १८९४ चा ब्रिटिशकालीन अन्यायकारक भूसंपादन कायदा बदलून नवीन कायदा केला आणि भूमिपुत्रांना १२.५% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लोकनेते दि बा पाटील यांनी आगरी कोळी समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालये उभी केली. दि. बा. पाटील विधानसभेत ४ वेळा आमदार, विरोधी पक्षनेता होते. तसेच लोकसभेत दोन वेळा खासदार होते. दोन्ही सभागृहातील त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. नवी मुंबईतील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून नवी मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. त्यामुळे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळासाठी योग्य असल्याचे नवी मुंबईकरांचे मत आहे.मंत्री एकनाथजी शिंदे यांची सर्वसामान्यांशी नाळ तुटताना दिसत आहे. विमानतळासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जमिनी संपादन करताना दिलेली आश्वासने सिडको पाळत नाही. या प्रश्नांवर न बोलता नगरविकास मंत्री नामकरणाच्या विषयात एकनाथ शिंदे का लक्ष घालत आहेत, याचा जाब मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमहोदयांना विचारणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाळ भांड्वलदारांशी जुळवून घेतली नाही ना असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडत आहे.मागील अनेक वर्षांपासून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, हि मागणी जोर धरत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे अचानक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी करून जे राजकारण करत आहेत, ते निंदनीय आहे. लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, हि मागणी अनेक संघटनांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्री यांना पत्र देऊन केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे समस्त मराठी जणांचे मानबिंदू आहेत. त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी समस्त मराठी जणांची अपेक्षा आहे. परंतु मागील सहा वर्षात शिवसेना राज्यात सत्तेत असूनही स्व. बाळासाहेबांचे स्मारक बनवू शकली नाही, हि दुर्दैवाची बाब आहे. अशा वेळी स्मारकाचे काम लवकर कसे होईल इकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देणे जरुरी आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात महाराष्ट्रात होणारा एखादा भव्य प्रकल्प असेल त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे आणि स्व. बाळासाहेबांचा यथोचित गौरव करणे अपेक्षित आहे.नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देऊन आणि भविष्यात महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या, भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन, तसेच स्व. बाळासाहेबांचे स्मारक लवकर पूर्ण करून दोन्ही महापुरुषांचा योग्य सन्मान राखला जाईल. तशी मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी अशी विनंती नवी मुंबई मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सहसचिव दिनेश पाटील, अभिजीत देसाई,,विभाग अध्यक्ष भूषण कोळी, योगेश शेटे, अमोल आयवळे, रोज़गार व स्वयंरोज़गार नवी मुंबई अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारिरिक सेना अध्यक्ष सागर नाइकरे,विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोज़गार व स्वयंरोज़गार उपशहर अध्यक्ष अनिकेत पाटील,उपविभाग अध्यक्ष युवराज मनसुख उपस्थित होते. 

Popular posts
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image