नेरूळ, पाम बीच व सीबीडी बेलापूर मध्ये ११६ वीजचोर, तब्बल २४ लाखाची वीजचोरी उघडकीस


बेलापूर वार्ताहर - महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीजचोरीवर आळा घालण्यासाठी नोव्हेंबर २०२० पासून विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गेल्या दोन महिन्यात भांडूप परिमंडळातील नेरूळ विभागाने ११६ प्रकरणात तब्बल २४ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली आहे.या वीजचोरट्यांवर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली असून एकूण २४ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे.

               मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार, वाशी मंडळचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली व नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नेरूळ विभागातील नेरूळ, पाम बीच, सीबीडी बेलापूर उपविभागात वीज चोरांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या ठिकाणी वीज जोडणी तपासल्यावर ११६ वीजचोरीचे प्रकरण समोर आले. ज्यामध्ये वीज कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार २३ प्रकरणात २.५३ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली. तसेच कलम १३५ नुसार ९३ प्रकरणात १६५२२८ युनिटची २१.४८ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली असून नेरूळ विभागात एकूण २४ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे. मीटर मध्ये फेरफार करणे, मीटर मध्ये रेझिस्टन्स टाकणे, चेंज ओव्हर स्वीचचा वापर करून मीटर बायपास करणे, सर्विस वायरला टॅप करून वीजचोरी करणे अशा प्रकारची विविध प्रकरणे उघडकीस आली आहेत. तरी ग्राहकांनी अमिषाला न बळी पडता प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा. वीजचोर म्हणून समाजातही प्रतिष्ठा कमी होतेच परंतु आपल्या मुलांच्या समोरही चोरीचाच आदर्श ठेवणे अयोग्य आहे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे व यापुढे सुद्धा वीजचोरांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. वीज चोरांमुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास होतोच तर कंपनीचे आर्थिक नुकसान ही होते. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद सर्व अधिकारी व कर्मचार्यांना, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी यापूर्वीच दिलेली आहे. तसेच, विहित मुदतीत वीजबिलसह दंडाची रकम न भरल्यास वीजचोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नेरूळ विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  

Popular posts
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image