नवी मुंबई विभागीय अग्निशमन अधिकाऱ्याचे राहत्या घरात अतिक्रमण,राजे प्रतिष्ठानचा आंदोलनाचा इशारा


नवी मुंबई - तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बेधडक अतिक्रमण कारवायानंतर तोच दरारा आजही मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कायम ठेवला आहे.त्यांच्या या दराऱ्यामुळे अतिक्रमण धारकांवर आजही कारवाईची टांगती तलवार आहे.त्यातच स्वच्छ भारत अभियान सुरु असल्याने अतिक्रमण कारवायात बांगर यांनी वाढ केली आहे.त्याच वेळी नवी मुंबईचे विभागीय अग्निशनम अधिकारी पुरोषोत्तम विनायकराव जाधव यांनी घराचा ताबा मिळण्याअगोदरच घराचा ताबा घेऊन त्यात अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे.या संबंधी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे राजे प्रतिष्ठान नवी मुंबईचे सचिव योगेश महाजन यांनी लेखी तक्रार केली असून अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर मनपा आयुक्त आता ते कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

                   नवी मुंबईचे विभागीय अग्निशनम अधिकारी पुरोषोत्तम विनायकराव जाधव हे एक उच्च अधिकारी आहेत.त्यांना मनपाच्या कोठ्यातून वाशी अग्निशमन केंद्र या ठिकाणी असलेल्या रहिवाशी इमारतीत १८ /१० /२०२० रोजी नियमांच्या आधिन राहून सदनिका देण्यात आली.तसे पत्र त्यांना सादर करण्यात आल्या नंतर त्यांनी तीन महिने अगोदरच या सदनिकेचा ताबा घेऊन त्यात अतिक्रमण केले असल्याची बाब समोर आली आहे.हे मनपाच्या पाहणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.जाधव यांनी सदनिकेमधील किचन लगत असलेली मोकळी जागा व डक्टची जागा बंधिस्त केली असून ती जागा किचन मध्ये समाविष्ट केली आहे .सदर बाब ही भोगवटा प्रमाणपत्र मंजूर नकाशाचे उल्लंघन करणारी असल्याचे मनपा अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.त्याचबरोबर त्याच सदनिकेमध्ये अंतर्गत लाकडी फर्निचरचे काम सुरु असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते मात्र तसे न करता त्यांना अतिक्रमण विभागाकडून अभय दिल्याने मनपा अतिक्रमाणात दुजाभाव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.जर एखाद्या लोकप्रतिनिधीने अनधिकृत बांधकाम केले तर त्यांचे पद रद्द करण्यात येत,त्याचबरोबर शहरात होत असलेल्या बहुतांश इमारतींवर मनपाचा अतिक्रमण विभाग आक्रमक होतांना दिसून येतो.मात्र या बाबतीत नमतेपणा का असा प्रश्न यावेळी योगेश महाजन यांनी उपस्थित केला आहे.या प्रकरणी तत्काळ पावले उचलून त्यांच्यावर ७ दिवसात बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी,तसे न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोनल करण्यात येईल असा इशाराही यावेळी योगेश महाजन यांनी दिला आहे.

कोट - अग्निशमन अधिकारी पुरषोत्तम जाधव यांनी अतिक्रमण केल्याची बाब ही जुनी आहे.तरी यावर योग्य ती माहिती घेतो.

शिरीष आधारवड - अग्निशमन अधिकारी 


Popular posts
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न
Image