लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2021 चा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पुरस्कार जाहीर



नवी मुंबई - युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातुन राजकिय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक,कला-क्रिडा,उद्योग,शिक्षण या विविध.क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे काम हि संस्था करत आहे.व्यक्ति आणी संस्था यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम हि संस्था करत आहे.संस्थेचे पुरस्कार देण्याचे हे पहिले वर्ष आहे.

महाराष्ट्रातील विविध भागातुन पुरस्करासाठी अर्ज मागविण्यात आले होते.या मध्ये नेरूळ मधील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांचे कार्य प्रभावीपणे संस्थेच्या निदर्शनास आले म्हणुन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात येत आहे अशी माहीती  युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री केवल गायकवाड यांनी दिली. ७ मार्च २०२१ हा सोहळा गावदेवी मैदान देवीचा पाडा या ठिकाणी आयोजित करून सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहे अशीही माहीती त्यांनी दिली.लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्वच स्थरातुन त्यांचे कौतुक होत आहे.नेरुळ गांवातील नागरीकांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे बोलतात.जिवन जगत असताना आपण या समाजाला काही तरी देणं लागतो. आणी हिच भावना मना मध्ये ठेवुन मी गेली अनेक वर्ष नेरूळ मध्ये काम करत आहे.तसे पाहीले तर कोणतेही राजकिय पाठबळ नसताना समाजाची सेवा करण खुप अवघड असते.परंतु यातुनही आम्ही मार्ग काढला.आणी जे काही या समाजात वंचित घटक आहे. त्यांना मदत करत गेलो.या कामी मला सर्वांची मदत झाली. आणि सर्वांच्या सहकार्याने हे काम शक्य झाले.आज जो मला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पुरस्कार मिळणार आहे. त्या पुरस्काराचे खरे मानकरी माझ्या बरोबर काम करणा-या माझ्या सर्व सहकारी या आहेत.या कोरोना महामाराच्या काळामध्ये आम्ही लोकांना मोफत मास्क पुरवले, सॅनिटायझर पुरवले,तसेच अनेक ठिकाणी रोशन देखील पुरविले.या कामी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य चे खुप असे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.हा पुरस्कार मला देवुन माझ्या संस्थेचा,माझे कार्याचा गौरव केल्याबद्दल मी युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री केवल गायकवाड याचे आभार मानते.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image