तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या की आत्म्हत्या ?




नवी मुंबई - सीबीडी - बेलापूर मधील राजश्री लॉटरीच्या दुकानात काम करणाऱ्या सत्यवान पानीरे (२७) या चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागला नसून तो जिवंत आहे कि त्याचा मृत्यू झालाय,त्याची हत्या झालीय अथवा त्याने आत्महत्या केलीय याचा काहीच तपास लागत नसून त्याचा तत्काळ शोध घ्या असे साकडे सत्यवान पानीरे (२७) यांचे मोठे बंधू श्रीकांत पानीरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना घातले आहे.या प्रकरणी त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी जी शेखर भेट घेतली असता बेपत्ता असलेल्या सत्यवानचा शोध लवकरात लवकर घेण्याची विनंती केली.

                   सत्यवान पानीरे (२७) त्याचे चुलत मामा संभाजी पाटील यांच्याकडे काही वर्षांपूर्वी कामाला आला होता.अनेक वर्ष काम करत असतांनाच त्याने मामाचा विश्वास संपादन केला असता संभाजी पाटील यांनी सत्यवानवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.गेल्या १० ते १६ वर्षाचा पगारही संभाजी पाटील यांच्याकडेच जमा असून पाटील सत्यवानला फक्त गरजेसाठी पैसे देत असत.घर घेऊन देतो,लग्न लावून देतो असे अनेक आमिषे दाखवून पाटील यांनी सत्यवानला कामाला ठेवले होते.फेब्रुवारी २०१७ मध्ये तो अचानक बेपत्ता झाल्याने संभाजी पाटील यांनीच तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल केली.त्या नंतर आजतायागत फक्त सत्यवानाचा शोधच सुरु आहे.त्याच्या परीरावालाही याबाबत अंधारात ठेवले असता अखेर भावाच्या शोधासाठी सत्यवानचे मोठे बंधू श्रीकांत (सुखदेव) बाळासो पानीरे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यावेळी त्यांनाही तपास सुरु आहे असेच सांगण्यात आले.त्यावर संभाजी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जर तुला माझ्यावर संशय असेल तर सत्यवानची बॉडी शोधून दाखव असे आव्हानच केले असता पानीरे यांच्या पायाखालची जमीनच सरकली.यावर अधिक चौकशी केली असता ज्यादिवशी सत्यवान बेपत्ता झाला त्या एक दिवस अगोदर त्याला संभाजी पाटील यांच्याकडून मारहाण करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली.त्याचबरोबर संभाजी पाटील यांच्या मोठ्या मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध असल्याची शक्यताही श्रीकांत (सुखदेव) बाळासो पानीरे यांनी व्यक्त केली आहे.संभाजी पाटील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे त्यानेच भावाचे काहीतरी बरेवाईट केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याची या प्रकरणात कठोर चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्रीकांत (सुखदेव) बाळासो पानीरे यांनी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी जी शेखर यांच्याकडे केली आहे.





 

Popular posts
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न
Image