वाशी सेक्टर ६ येथे जुन्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम तोडून त्या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम मनपाकडून सुरु करण्यात आले आहे.तर या कामाचे भूमिपूजन होत असतांनाही माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले नाही.यावर आम्ही त्यांना विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी या कामाची माहिती देण्याऐवजी मला गुंड म्हणून संबोधले. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करण्याचा घाट या नगरसेवकांमार्फत सुरु असून राजकीय सूडबुद्धीने सदर प्रकार करण्यात आला असल्याचा आरोपही भोजने यांनी केला आहे.ज्यावेळी पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी त्या ठिकाणी मनपाचा कोणताही अधिकारी त्या ठिकाणी नव्हता.याची माहिती मिळताच भोजने यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.व विचारणा केली असता गायकवाड यांनी माहिती देण्यास नकार देत अरेरावीची भाषा वापरली असल्याचीही माहिती भोजने यांनी दिली.
पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाची वर्क ऑर्डर असून पालिकेने काम सुरु केले आहे.त्यामुळे ते कामाचे उद्घाटन करण्यात येत आहे.त्या ठिकाणी राहत नसणारे गृहस्थ मुद्दामहून कामामध्ये खोडा घालण्याचे काम करत असून बिनबुडाचे आरोप करत आहेत.त्याच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी सांगितले.